संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कडधान्य चुकाऱ्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

जळगाव : जिल्ह्यात ३१ डिसेंबर रोजी तीनही कडधान्य खरेदी केंद्र सुरू झाले, परंतु अद्याप निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना या केंद्रात विक्री केलेल्या मूग व उडदाचे चुकारे मिळाले नसून, शेतकऱ्यांना चुकारे मिळण्याची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात नाफेडअंतर्गत मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जळगाव, पाचोरा व अमळनेर येथे कडधान्य खरेदी केंद्र सुरू झाले होते. शेतकी संघ व बाजार समिती आदींनी सब एजंट म्हणून कार्यवाही केली. शासकीय खरेदी केंद्रात उडदाची अधिक विक्री झाली. परंतु मुगाची विक्री अतिशय कमी झाली आहे. केंद्र बंद झाल्याच्या दिवसापूर्वी १०-१२ दिवस ज्या कडधान्यांची विक्री झाली, त्याचे चुकारे अजून आलेले नसल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनने दिली.

तीनही खरेदी केंद्रांवर उडदाची १५ हजार २०० क्विंटल व मुगाची २९२० क्विंटल खरेदी झाली. उडदाला ५४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. तर मुगाला ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर देण्यात आला.

सोयाबीन खरेदीची मुदत १३ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात पाचोरा, अमळनेर व जळगाव येथे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू असून, १३ जानेवारी रोजी ही केंद्रे बंद होतील. या तिन्ही केंद्रांवर सुमारे ६६६ क्विंटल सोयाबीन खरेदी झाल्याची माहिती मिळाली. 

नाफेडच्या कार्यालयातून पैसे येत नसल्याने शेतकऱ्यांचे चुकारे दिले जात नसल्याची कारणे कडधान्य खरेदी करणाऱ्या यंत्रणा देत आहेत. चुकारे मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. - किशोर चौधरी, शेतकरी, आसोदे, जि. जळगाव

कडधान्यांच्या खरेदीपोटी मार्केटिंग पाच कोटी ४५ लाख रुपये शेतकऱ्यांना वितरित केले आहेत. मागील १०-१२ दिवसांत ज्यांचे कडधान्य खरेदी केले, त्यांचे चुकारे थकले आहेत. त्यासंबंधी वरिष्ठ कार्यालयाकडून कार्यवाही होत असते. - परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT