Farmer Sons' #soybean trend
Farmer Sons' #soybean trend 
मुख्य बातम्या

शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंड

टीम अॅग्रोवन

नांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आल्याने राज्यातील शेतकरी पुत्रांनी याकडे केंद्र, तसेच राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी #सोयाबीन हा ट्रेंड गुरुवारी (ता. २३) सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत चालविण्यात आला. यामध्ये हजारो शेतकरी पुत्रांनी सहभाग घेत या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष्य देण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येण्यापूर्वी १० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. तशा पावत्या समाजमाध्यमातून फिरत होत्या. परंतु नव्या सोयाबीनची आवक सुरू होताच दर कमी मिळत असून शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर हा ट्रेंड केला जात आहे.

दर किमान ३००० रुपये गुरुवारी (ता. २३) राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ३००० रुपये, तर कमाल ६७०० रुपये दर मिळाला. अकोल्यात ४५०० ते ५५०० रुपये, जालन्यात ४७०० ते ५७०० रुपये, हिंगोली ५५०० ते ६४०० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT