Farmer scientist who has been experimenting many years : Devasarkar
Farmer scientist who has been experimenting many years : Devasarkar 
मुख्य बातम्या

वर्षानुवर्षे प्रयोग करणारा शेतकरी शास्त्रज्ञच : डॉ. देवसरकर

टीम अॅग्रोवन

बदनापूर जि. जालना : शेतकरी वर्षानुवर्षे शेती करीत आहे. या दरम्यान तो स्वतः च्या प्रक्षेत्रावार विविध प्रयोग करतो. केवळ वैज्ञानिक पद्धतीने कागदोपत्री निरीक्षणे न नोंदविल्याने प्रत्यक्ष प्रकाशझोतात ते येऊ शकत नाहीत. त्यामुळे शेतकरीही खरे शास्त्रज्ञच आहेत,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी व्यक्त केले. 

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवीन दिल्लीच्या नियमानुसार सर्व कृषी विज्ञान केंद्राने संशोधन व तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊनच करावा. त्या अनुषंगाने कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर येथे वैज्ञानिक सल्लागार समितीची बैठक बुधवारी (ता. ५) झाली.

तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठके, बदनापूर ‘केव्हीके’चे प्रभारी अधिकारी डॉ. डी. के. पाटील, मोसंबी संशोधन केंद्र प्रमुख डॉ. संजय पाटील, कृषी महाविद्यालय बदनापूरचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एस. माने, शेतकरी संजय मोरे, सुभाष बोडके, नंदा मुळे उपस्थित होत्या. 

वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सचिनकुमार सोमवंशी यांनी कृषी विज्ञान केंद्र बदनापूरद्वारे घेण्यात आलेल्या विविध प्रक्षेत्र चाचण्या, आद्यरेषीये प्रात्यक्षिके, प्रशिक्षण व कृषी विस्तार कार्यक्रमाचा अहवाल सादर केला. २०२०-२१ साठी कृती आराखडा प्रस्तुत केला. रेशीम उत्पादन तंत्रज्ञान, एकात्मिक शेती पद्धती काळाची गरज, कांदा लागवड व व्यवस्थापन तंत्रज्ञान, गुणकारी बाजरी, शाश्वत शेती आदी विषयावर चर्चा झाली. पुस्तिका व घडीपत्रिकेचे विमोचन झाले. डॉ. राहुल कदम यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सचिन धांडगे यांनी आभार मानले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT