farmer plagh
farmer plagh  
मुख्य बातम्या

सोयाबीनची उगवण न झाल्याने जड अंतकरणाने पिकांवर नांगर

टीम अॅग्रोवन

अकोला ः बियाण्याचा दर्जा, पावसाचा खंड व इतर कारणांमुळे सोयाबीनची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागत आहे. शेतकरी पहिल्या पेरणीवर नांगर फिरवून दुसऱ्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. पहिल्या पेरणीसाठी हजारोंचा खर्च शेतकऱ्यांचा झाला असून, आता दुबार पेरणीसाठी तजवीज करताना मोठी कसरत करावी लागत आहे. अकोला शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कापशी शिवारात सिंदखेड येथील शेतकरी श्री. वानखडे यांच्या शेतात रविवारी (ता. २८) दुपारी ट्रॅक्टर चालविण्यात आला. त्यांनी १४ जूनला अडीच एकरात सोयाबीन व तुरीची पेरणी केली आहे. लागवड केलेल्या बियाण्यांपैकी ४० टक्केच उगवण झाली. मध्यंतरी १० किलो बियाणे आणून त्यांनी टोकणही केले; परंतु पाऊसच नसल्याने हे बियाणेही आतच कुजले. त्यामुळे संपूर्ण शेत वखरण्याचा निर्णय घेत त्यांनी ट्रॅक्टर फिरवला.  या पेरणीसाठी मशागतीपासून तर लागवडीपर्यंत २० हजार रुपये खर्च झाल्याचे ते म्हणाले. यंदा अद्याप पीककर्ज मिळालेले नाही. खासगी व्यक्तीकडून व्याजाने पैसे आणून पेरणी केली होती. हा पहिला खर्च वाया गेला. आता दुसऱ्या पेरणीसाठी बियाण्याची कशी जुळवाजुळव करायची, पेरणी कशाने करायची हा पेच असल्याचे त्यांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यातील येऊलखेड परिसरात पेरणी झाल्यानंतर जवळपास २० दिवस झाले पाऊस नाही. यामुळे पिके कोमेजून गेली आहेत. रविवारी या शिवारातही जवळपास १०० एकरातील पीक मोडण्यात आले. येऊलखेड परिसरात जूनच्या सुरुवातीला पुरेसा पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. त्यानंतर पावसात २० दिवसांचा खंड पडला. जे पीक उगवले होते ते उष्णतेमुळे तग धरू शकले नाही. त्यामुळे येऊलखेड येथील सदानंद पुंडकर यांनी २८ एकर, श्रीधर पुंडकर ३५ एकर, मोहन पाटील ८ एकर, अरुण मेटांगे, शिवशंकर पुंडकर, शशी पुंडकर व इतर शेतकऱ्यांनी मिळून १०० एकरांतील पिकावर नांगर फिरवला. आता कृषी खात्याचे पथक तेथे जाऊन पाहणी करणार आहे.  पीक मोडण्याची कारणे 

  •  पीक अर्धवट उगवले
  •  बियाणे दर्जेदार नव्हते
  •  पावसाचा खंड वाढला
  •  टोकण केलेलेही उगवले नाही
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

    Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

    River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

    Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

    Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

    SCROLL FOR NEXT