देवस्थान जमिनीबाबत रविवारी कोल्हापुरात परिषद
देवस्थान जमिनीबाबत रविवारी कोल्हापुरात परिषद 
मुख्य बातम्या

देवस्थान जमिनीबाबत रविवारी कोल्हापुरात परिषद

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर ः देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात या मागणीसाठी येत्या रविवारी (ता. १६) देवस्थान शेतकरी परिषद होणार आहे. शाहू स्मारक भवनात दुपारी एक वाजता ही परिषद होईल यात किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, शेतकरी नेते उमेश देशमुख, डॉ. असोक ढवळे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती किसान सभेचे अध्यक्ष डॉ. उदय नारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  महाराष्ट्रातील विविध देवस्थानांची दैनंदिन पूजाअर्चा करण्यासाठी इनाम वर्ग ३ नुसार पिढ्यान पिढ्या शेतकरी जमीन कसत आहेत. त्यांची वतने खालसा करून कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन करण्यात आली. त्याच धर्तीवर देवस्थानच्या जमीन कसरणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, अशी मागणी किसान परिषद गेली अनेक वर्षे करीत आहे.  त्यासाठी किसान सभेच्या झेंड्याखाली सनदशीर मार्गाने आंदोलन केले. किसान सभेतर्फे ५० हजार शेतकऱ्यांच्या नाशिक ते मुंबई असा लॉंग मार्चही काढण्यात आला. देवस्थान जमीनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे व्हाव्यात अशी प्रमुख मागणी या मार्चद्वारे करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबत कायदा करण्याची सकारात्मक भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली होती. तसेच विधानसभेत विधेयक मांडू, असे लेखी अश्‍वासनही विधानसभेच्या पटलावर ठेवले गेले, मात्र सरकारने दिलेले आश्‍वासन पाळलेले नाही. त्यानंतर १४ फेब्रुवारीला नाशिक-मुंबई दुसरा लॉंग मार्च काढण्याच इशारा दिला. तेव्हाही महसूल विभागाचे सचिवांनी शेतकरी शिष्ठमंडळाशी चर्चा केली होती. तेव्हाही देवस्थानच्या जमिनी कसरणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याबाबतचे विधेयक जवळजवळ पूर्ण होत आल्याचे सांगितले होते. मात्र अद्यापही कार्यवाही झालेली नाही. त्यानंतर प्रत्यक्ष लॉंग मार्च निघाल्यानंतर देवस्थान जमिनी इनाम वर्ग ३ ची वेतन खालसा करण्याविषयी लेखी अश्‍वासन दिले. त्यानुसार २०१९ च्या पावसाळी अधिवेशनात हा कायदा करू, असे लेखी आश्‍वासन दिले. मात्र त्यानुसार येत्या १७ जूनपासून होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या कराव्यात हा कायदा मंजूर करावा, अशी मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT