Farmer companies in Pusad Live sale of vegetables
Farmer companies in Pusad Live sale of vegetables 
मुख्य बातम्या

पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे भाजीपाल्याची थेट विक्री

टीम अॅग्रोवन

यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री केली जात आहे. 

‘कोरोना’मुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या काळात ग्राहकांना अत्यावश्‍यक सेवा म्हणून भाजीपाला विक्रीची मुभा देण्यात आली आहे. ही दुकाने मोजकीच असल्याने त्या ठिकाणी गर्दी होते. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका संभवतो. त्यामुळे पुसद तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकरी उत्पादक कंपनीकडून थेट घरपोच ताजा भाजीपाला व फळांचा पुरवठा होत आहे. 

वेणी येथील संत खप्ती शेतकरी उत्पादक कंपनीने पुढाकार घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत जवळपास चार टन भाजीपाला, चार क्‍विंटल फळे व पाच क्‍विंटल विविध डाळी शहरातील विविध भागात घरपोच पुरविण्यात आल्या, अशी माहिती कंपनीचे संचालक रविंद्र पुंड यांनी दिली. 

संचारबंदीच्या काळात शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांना सुरक्षित वाहतूक करता यावी, यासाठी महसूल व कृषी विभागाकडून वाहतूक पास व ओळखपत्र देण्यात आले आहे. हा उपक्रम उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, मंडळ कृषी अधिकारी ए. के. वडकुते, बि. डी. चेक, एन. एस. राठोड, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक एस. डी. मोरे, कृषी सहाय्यक एस. के. राठोड राबवित आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT