शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात 
शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात  
मुख्य बातम्या

शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात ! 

टीम अॅग्रोवन

नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या शिवारात तडा गेल्याचे एका शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. नगरकडे येणारी हुतात्मा एक्‍स्प्रेस भुसावळ-पुणे रेल्वेगाडी रूळ तुटल्याने मध्येच थांबवली. तत्काळ रेल्वे प्रशासनाला ही माहिती कळविल्याने तात्पुरती दुरुस्ती करून रेल्वे मार्गस्थ करण्यात आली. 

नगर-मनमाड रेल्वेमार्गावरील देहरे-विळद गावाच्या शिवारात थोरात वस्ती आहे. तेथील शेतकरी रामदास बापूराव थोरात रविवारी सकाळी रेल्वे रूळ ओलांडून शेतात चालले होते. त्या वेळी रेल्वे रुळाला तडा गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ रेल्वे रूळावर गस्त (पेट्रोलिंग) घालणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला सांगितले. मात्र, त्याचवेळी मनमाडकडून नगरच्या दिशेने भुसावळ-पुणे ही रेल्वे येत होती. त्यामुळे शेतकरी रामदास थोरात यांनी अंगातील लाल बनियन काढून रेल्वे पटरीवर उभे राहिले. ते लाल बनियन पाहून रेल्वेचालकाने धोक्‍याची सूचना ओळखली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

रेल्वेचालक खाली उतरल्यावर शेतकऱ्याने रेल्वे रूळ तुटल्याचे सांगितले. रेल्वे कर्मचाऱ्याने त्या घटनेबाबत वरिष्ठांना कळविले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक निश्‍चित जोशी, सुनील चांदणे, रेल्वेचे पोलिस निरीक्षक देवीसिंग बाविस्कर, पोलिस नाईक संजय लांडगे, उमेश कांगो, आनंद मुठे आणि मध्य रेल्वेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे रुळाची तात्पुरती दुरुस्ती करून रेल्वेगाडी पुढे रवाना केली. या धाडसाबद्दल शेतकरी रामदास थोरात यांचे कौतुक केले.

शेतात जात असताना रेल्वेरूळ तुटलेला दिसला. त्या वेळी रेल्वे कर्मचारी दोन फूट अंतरावर होता. समोरून रेल्वे येत असल्याचे पाहून मी धास्तावलो. परंतु तत्काळ अंगातील बनियन काढले. ते नेमके लाल रंगाचे होते. ते पाहून रेल्वेचालकाने गाडी थांबविली आणि पुढील अनर्थ टळला, याचे समाधान आहे.  - रामदास थोरात, शेतकरी 

विळद येथील शेतकरी नेहमीच सतर्क असतात. आज शेतकऱ्याने दिलेल्या माहितीमुळे रेल्वेचा धोका टळला.  - राजेंद्र कुलकर्णी, विळद स्टेशन मॅनेजर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT