indian-farmer
indian-farmer 
मुख्य बातम्या

डिझेल मिळत नसल्याने शेतीकामांना ‘ब्रेक’

सुर्यकांत नेटके

नगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. या कालावधीत पेट्रोल पंपांना शेतीची कामांसाठी शेतकऱ्यांच्या वाहनांना इंधन देण्याचे आदेश आहेत. मात्र राज्यातील अनेक भागांसह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वाहनांना इंधन दिले जात नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शेतीकामांना ‘’ब्रेक’’ लागला आहे. सध्याची शेतीची कामे होत नसून त्याचा दोन महिन्यावर आलेल्या खरिपावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देश, राज्यात लॉकडाउन केले आहे. मात्र खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने हा हंगाम अडचणीत येऊ नये यासाठी शेतकऱ्यांच्या वाहनांना गरजेच्या वेळी इंधन देण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे पाहायला मिळत आहे. आता शेतीतील बहुतांश कामे ट्रॅक्टर व अन्य यंत्रांच्या माध्यमातूनच केली जातात. सध्या खरिपाच्या पार्श्वभूमीवर नांगरणी, पाळी, मोघडणी तसेच फळबागांत छाटणी, फवारणीसह उसाची खांदणी थांबलेली आहे. अनेक पिकांची सोंगणी सुरु असून काढणी केलेला शेतमालही घरापर्यंत आणायला अडचणी निर्माण होत आहेत. ‘बंद’मध्ये शेतीची कामे बंद राहू नयेत, यासाठी शेतकऱ्यांच्या वाहनांना इंधन देण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. कोरोनाचा अधिक संसर्ग असलेल्या जिल्ह्यांमध्ये सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत तर कमी प्रमाणात संसर्ग असलेल्या भागांत सकाळी अकरा वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरु ठेवले जात आहेत. अन्य काळात इंधन मिळणे अपेक्षित आहे, मात्र ते तर दिले जात नाहीच, पण पंप सुरु असलेल्या काळातही अडवणूक होत आहे. सरकारी आदेश असताना इंधन का मिळत नाही, अशी विचारणा केलीच तर इंधन देतो ट्रॅक्टर पंपावर आणा असे काही पंपांवर सांगितले जात आहे. प्रतिक्रिया माझ्याकडे ट्रॅक्टर असून मी दरवर्षी नांगरणी, मोघडणी तसेच अन्य कामे करतो. मात्र सध्या इंधन मिळण्याला अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतीची मोठी कामे ठप्प झाली आहेत. आमचा भाग दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळे सध्याच्या काळात शेतीची सर्व कामे करून खरिपासाठी तयारी केली जाते. - सत्यवान बर्डे, शेतकरी, तिसगाव, जि. नगर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT