शेत जमिनी गेल्या पाण्याखाली Farm lands under water
शेत जमिनी गेल्या पाण्याखाली Farm lands under water 
मुख्य बातम्या

शेत जमिनी गेल्या पाण्याखाली

टीम अॅग्रोवन

अमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेमुर्वतखोर आणि पूर्णतः बेकायदा खोदकामाने कठोर बु ते रेवसा या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाणबसन झाल्या आहेत. हा प्रश्न निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन करण्यासोबतच न्यायालयात जाण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.     सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खोदकामामुळे शेतात पाणी साचल्याने शेतातील उभी पिके धोक्यात आली आहेत. या बहुतेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात येणे जाणे सुद्धा कठीण झाल्याने शेतातील उभ्या पिकांचे सरंक्षण व संवर्धन करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  कठोरा ते रेवसा हा साडेतीन किलोमीटरचा मार्ग पुढे रेवसा येथून वलगाव म्हणजे अमरावती, अचलपूर, धारणी, बऱ्हाणपूर या महामार्गाला मिळतो. तर कठोरा अगोदर तो अमरावती, नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचा पोच रस्ता म्हणजे रिंग रोडचा भाग आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी व नाविनिकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून ४० फूट रुंदीच्या या मार्गाचे काम नुकतेच पूर्ण केले. या सुधारित रस्त्याच्या दोन्ही बाजूला भराव टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुमारे १० फूट रुंद आणि ५ फूट पेक्षा अधिक खोल नाल्या जेसीबीच्या सहाय्याने खोदल्या. त्यातील मातीचा भराव रस्त्याच्या कडेला टाकला आणि हे करताना कोणत्याही शेतकऱ्याची परवानगी घेण्याची तर सोडा, त्यांना साधी पूर्व कल्पनाही दिलेली नाही. बांधकाम खात्याने त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने तब्बल २० ते ३० फूट आत, शेतकऱ्यांच्या खासगी शेतात घुसखोरी केली आहे. शेतीच्या कामांमध्ये अडथळे पावसाचे पाणी तुडुंब भरल्याने व नाल्यातील पाण्याला आउटलेट नसल्याने ते अनेक शेतात पसरले आहे.  शिवाय, या दहा फूट रुंदीच्या खोल नाल्या ओलांडून शेतात कसे जावे आणि खते, फवारण्याची औषधी, बैलजोड्या, अन्य सामुग्री शेतात कशी न्यावी ही अडचण शेतकऱ्यांपुढे निर्माण झाली आहे.विद्युत खांब कोसळले तर विद्युत वाहक तारांमुळे आणखी मोठा धोका उदभवू शकतो. कारण बांधकाम खात्याने शेतकऱ्यांच्या शेतात घुसून खोदलेल्या या नाल्यामधील पाण्याला कुठेही विसर्ग दिलेला नाही.त्यामुळे ते शेतातील तूर, कपाशी व अन्य पिकात साचले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या सीमा भिंती कोलमडून पडल्या आहेत. सर्वत्र दलदल झाली आहे. बाधकाम विभागाने संपादित जमिनीच्या आत येऊन काही ठिकाणी खोदकाम केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Ear Tagging : ‘ईयर टॅगिंग’शिवाय जनावरांची वाहतूक बंद

Mango Market : अक्षय तृतीयेच्या बाजारात आंब्याची आवक सर्वसाधारण

Bhatghar Dam : टंचाईमुळे भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद

Sugar Export : साखरेच्या २० लाख टन निर्यातीस परवानगी द्या

Gold Rate : सोने पुन्हा चकाकले

SCROLL FOR NEXT