रत्नागिरी : शेती साहित्य, अवजारे उपलब्ध करून द्या
रत्नागिरी : शेती साहित्य, अवजारे उपलब्ध करून द्या 
मुख्य बातम्या

रत्नागिरी : शेती साहित्य, अवजारे उपलब्ध करून द्या

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी ः कोरोनाबाधित क्षेत्र वगळून जिल्ह्यातील अन्य सर्व भागातील शेतकऱ्यांना आवश्यक शेतीची साहित्य आणि अवजारे उपलब्ध करून द्या, अशा सूचना जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी कृषी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

कृषी समितीची बैठक नुकतीच जिल्हा परिषदेत झाली. या वेळी मागील वर्षात झालेल्या खर्चांचा आढावा घेण्यात आला. मार्च २०२० अखेरपर्यंत ९८ टक्के निधी खर्ची पडल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. कोरोनामुळे केलेल्या टाळेबंदीच्या वातावरणातही कृषी अधिकाऱ्यांनी तळागाळातील लोकांच्या संपर्कात राहून जिल्हा परिषदेतर्फे आवश्यक अनुदानावरील साहित्य पोच केले; मात्र रेड झोनमधील शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता आलेला नव्हता. कृषी विभागाला २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ५५ लाखाचा निधी मंजूर होता. त्यातून ताडपत्री, आंब्याचे ट्रे, फवारणी पंप यासह शेतीविषयक साहित्य अनुदानावर शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार होते. त्यासाठीच्या याद्या मंजूर करून ठेवण्यात आल्या होत्या. वस्तू खरेदी केल्या गेल्या. मात्र आयत्यावेळी कोरोनाने पाय पसरल्यामुळे वाटप करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावरही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात करत काम केले. या बद्दल नाटेकर यांनी प्रशासनाचे कौतुक केले.  या बैठकीमध्ये येऊ घातलेल्या खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले. पुढील वर्षात शेतकऱ्यांना आवश्यक शेतीची अवजारे तत्काळ उपलब्ध करून द्या, अशा सूचना नाटेकर यांनी केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत, त्याची छाननी करा आणि साहित्य मंजूर करा तसेच अन्य शेतकऱ्यांचे अर्ज मागवून ते पुढील प्रक्रियेसाठी पाठवून द्या. ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नसेल तिथे वस्तूंचे वाटप सुरू करा. यंदा आर्थिक वर्षासाठी ५० लाख रुपये उपलब्ध आहेत.  गतवर्षीच्या तुलनेत पाच लाखाचा कमी निधी मिळाला आहे. तसे नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यासाठी २० हजार टन खताची मागणी करण्यात आली आहे. त्यातील दोन हजार टन खत उपलब्ध आहे. तसेच सुमारे तीन हजार टन बियाणेही विक्रीसाठी उपलब्ध आहे. आवश्यक खतसाठा येत्या दोन दिवसात मिळेल, असा विश्‍वास या बैठकीत कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT