वादळी पाऊस
वादळी पाऊस  
मुख्य बातम्या

फणी वादळाची जोरदार धडक

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरातील फणी चक्रीवादळ शुक्रवारी (ता. ३) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ओडिशातील पुरीजवळ किनाऱ्याला धडकले. १० वाजता वादळ पूर्णपणे जमिनीवर आले. मुसळधार पाऊस आणि ताशी १७५ किलोमीटर वेगाने वाहणारे वारे यामुळे भुवनेश्वरमध्ये झाडे आणि इमारती पडून नुकसान झाले. सुमारे ११ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करत, खबरदारी घेतल्याने मोठी जीवितहानी टळली.   जोरदार वाऱ्यामुळे गंजाम, पुरी, खुर्दा, गजपती जिल्ह्यांत दूरगामी परिणाम होणार आहे. किनारपट्टीवरील ११ जिल्ह्यांच्या सखल भागातील नागरिकांना स्थलांतरित करून, ४ हजार छावण्या आणि ८८० वादळ संरक्षक केंद्रांमध्ये आश्रय देण्यात आला. जमिनीवर आल्यानंतर खुर्दा, कटक, जयपूर, भद्रक आणि बालासोरलगत प्रवास करून वादळाने पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला आहे, अशी माहिती विशेष आपत्ती व्यवस्थापन आयुक्त बी. पी. सेठी यांनी दिली.    ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील वीज आणि संदेशवहन यंत्रणा पूर्णपणे कोसळली असून, या सेवा पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याचे राष्ट्रीय आपत्ती निवारण केंद्रातर्फे सांगण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), नौदल, सागरी तटरक्षक दल, लष्कर आणि हवाई दल यांच्यामार्फत मदतकार्य सुरू आहे.

तीन जणांचा बळी फणी चक्रीवादळाने अोडिशातील तीन जणांचा बळी घेतल आहे. पुरी जिल्ह्यात अंगावर झाड पडून अल्पवयीन युवकाचा मृत्यू झाला. नयागड जिल्ह्यात अंगावर भिंत पडून पाणी आणायला गेलेल्या महिलेचा मृत्यू झाला, तर केंद्रपाडा जिल्ह्यातील ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेला जीव गमावावा लागल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. आज जोरदार पावसाचा इशारा फणी चक्रीवादळ जमिनीवर दाखल झाल्यानंतर त्याची तीव्रता कमी होऊ लागली आहे. हे वादळ बांगलादेशाकडे सरकत असून, उद्या (ता. ५) तीव्रता ओसरणार आहे. आज (ता. ४) ओडिशातील बालासोर आणि मयूरभंज जिल्हा, आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे; तर ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.  संहारक वादळ

  • समुद्रात आलेल्या उंच लाटांमुळे किनारी भागात नुकसान
  •   जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी
  • भुवनेश्वर, केंद्रपारा, जगतपूरसिंह परिसरात वादळी पाऊस 
  • श्रीकाकुलम भागात २० घरे कोसळली
  • पुरी येथे भूस्खलनामुळे घरांचे नुकसान
  • पुरी, गंजम, खुर्दा, गजपती जिल्ह्यांत वादळी पावसाचा तडाखा
  • ११ जिल्ह्यांतील ११ लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
  • वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू
  • वादळ प्रभावित राज्यांसाठी केंद्राची एक हजार कोटींची मदत
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

    Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    SCROLL FOR NEXT