Eyes watered again in 'Antim Ardas' ...
Eyes watered again in 'Antim Ardas' ... 
मुख्य बातम्या

‘अंतिम अरदास’मध्ये पुन्हा पाणावले डोळे...

टीम अॅग्रोवन

लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश : येथील तिकोनिया येथे शेतकरी हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्यांकरिता आयोजित ‘अंतिम अरदास’ या धार्मिक विधी कार्यक्रमास सुमारे १० हजार शेतकरी उपस्थित होते. या वेळी मृतांच्या आत्म्यास शांततेकरिता प्रार्थना होऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी कुटुंबीयांसह उपस्थितांचे डोळे पाणावले.  

लखीमपूर खेरी येथे केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात ३ ऑक्टोबरला शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर निदर्यपणे गाडी घातल्याच्या घटनेत चार शेतकऱ्यांसह एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. यात मृत्युमुखी पडलेल्याकरिता ‘अंतिम अरदास’चे मंगळवारी (ता.१२) आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेशासह विविध राज्यांतून शेतकरी, शेतकरी नेते विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शहीद शेतकऱ्यांचे अस्थींचे कलश विविध राज्यांत दर्शनाकरिता रवाना करण्यात आले. 

प्रियंका, जयंतसिंह यांची उपस्थिती काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतसिंह या वेळी उपस्थित होते.

अंतिम अरदास म्हणजे... शीख धर्मीयांत जेव्हा कोणाचा मृत्यू होतो, त्या व्यक्तीकरिता सातव्या दिवसापासून अखंडित (२४ तास) गुरुग्रंथसाहिब यांचे पठण केले जाते. दर दोन तासांनी एकजण हे पठण करतो, असे सलग तीन दिवस चालते, शेवटी १०व्या दिवशी हे धार्मिक पठण पूर्ण होते, त्या वेळी मृताच्या आत्म्यास शांतता मिळण्याकरिता देवाकडे प्रार्थना केली जाते. या दहाव्या दिवसाला ‘अंतिम अरदास’ असे म्हटले जाते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT