milk powder
milk powder  
मुख्य बातम्या

Milk Powder Yojana : दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

टीम अॅग्रोवन

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाचे रुपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी (ता. ८) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  शासनाने एप्रिल २०२० पासून प्रतिदिन अतिरिक्त ठरणाऱ्या दुधापैकी १० लाख लिटर दुधाचे रुपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना सुरू केली. सुरुवातीला ही योजना एप्रिल व मे या २ महिन्यांसाठी राबविण्यात आली. त्यानंतर या योजनेस ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, राज्यातील अतिरिक्त दुधाची परिस्थिती अद्यापही सुधारलेली नसल्याने या योजनेस १ महिन्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. या १ महिन्याच्या वाढीव कालावधीत सरासरी प्रतिदिन ५ लाख १४ हजार लिटर याप्रमाणे १ कोटी ६० लाख लिटर दुधाचे रुपांतरण भुकटीत केले जाणार आहे. त्यासाठी ५१ कोटी २२ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. संपूर्ण योजना कालावधीत एकूण ६ कोटी लिटर दूध स्वीकृत केले जाणार असून त्यापोटी १९० कोटी इतका निधी वितरित केला जाणार आहे. केंद्राने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २४ मार्चपासून लॉकडाउन घेाषित केला होता. राज्यानेही १९ मार्चपासून राज्यात लॉकडाउन लागू केला होता. लॉकडाउनमध्ये बाजारात पिशवी बंद दुधाच्या मागणीत झालेली घट तसेच हॉटेल, रेस्टॉरंट व मिष्ठान्न निर्मिती केंद्र मोठ्या प्रमाणात बंद झाल्यामुळे राज्यातील दैनंदिन दुधाची विक्री सर्वसाधारण १७ लाख लिटरने कमी झाली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT