शेतकऱ्यांशी चर्चा करताना ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, इजिप्तमधील निर्यातदार तौफिक अहमद आदी.
शेतकऱ्यांशी चर्चा करताना ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, इजिप्तमधील निर्यातदार तौफिक अहमद आदी. 
मुख्य बातम्या

‘स्मार्ट व्हिलेज’मधील गावांत इजिप्तच्या निर्यातदारांचा दौरा

सकाळ वृत्तसेवा

टाकळी हाजी/आळेफाटा, जि. पुणे ः सकाळ माध्यम समूहातर्फे ‘सकाळ ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज’ प्रकल्पामध्ये निवड झालेल्या पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) व पारगावतर्फे आळे (ता. जुन्नर) या गावांना इजिप्तमधील निर्यातदार तौफिक अहमद व हातेम इल इझावी यांनी ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्यासमवेत भेट दिली.  इझावी हे इजिप्तमधील पिको ॲग्रिकल्चर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, तर अहमद हे ‘डाल्टेक्‍स कॉर्प’चे व्यावसायिक संचालक आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उत्पादित मालाची पाहणी करत उत्पादन खर्च, एकरी उत्पादन; तसेच बाजारभावाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. नव्या तांत्रिक युगात उत्पादन खर्च व बाजारभाव यावर शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देण्यास त्यांनी सांगितले. केळी, कलिंगड, डाळिंब, द्राक्षाच्या फळबागांना भेट दिली. ठिबकवर पाण्याचे व्यवस्थापन करून घेतलेले मिरची आणि कारल्याच्या शेतीची माहिती घेतली. गायीच्या गोठ्याची पाहणी करून पूरक व्यवसाय म्हणून केल्या जाणाऱ्या दुग्धव्यवसायाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. सकाळ ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्पामध्ये पारगावतर्फे आळे, बोरी बुद्रुक, वडगाव कांदळी, काळवाडी ही जुन्नर तालुक्‍यातील आणि टाकळी हाजी या शिरूर तालुक्‍यातील गावाचा समावेश आहे. अभ्यास दौऱ्यात शिष्टमंडळाने टाकळी हाजीमध्ये ‘सकाळ’च्या तनिष्का गटाच्या कामांचीही माहिती घेतली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT