grapes
grapes  
मुख्य बातम्या

निर्यातक्षम द्राक्ष बागा नोंदणीला प्रारंभ

टीम अॅग्रोवन

नाशिक: द्राक्ष निर्यातीला चालना देण्यासाठी तसेच युरोपियन देशांत होणाऱ्या निर्यातीकरिता रासायनिक अंशमुक्त द्राक्षाच्या निर्यातीसाठी ‘अपेडा’च्या ‘ग्रेपनेट’ प्रणालीअंतर्गत नोंदणी करण्यात येते. २०२०-२१च्या हंगामाकरिता निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधून विहित मुदतीत नोंदणी तसेच नूतनीकरण करण्याचे आवाहन फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी केले आहे. कीडनाशक उर्वरित अंश व कीड रोगांची हमी देण्याकरिता ‘ग्रेपनेट’व्दारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी होते. त्यानुसार केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती यांनी द्राक्ष पिकांकरिता कायदेशीर प्रमाणित केलेल्या कीडनाशकांची यादी व द्राक्ष बागांसंबंधी चालू हंगामाकरिता वापरण्याच्या कृषी कीडनाशकांची यादी अंतिम करुन ग्रेपनेट प्रणालीवर २० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली आहे. त्या अनुषंगाने निर्यातक्षम द्राक्ष बागा नोंदणीसाठी ग्रेपनेट  ऑनलाइन प्रणाली ८ ऑक्टोबरपासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे.  द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी तसेच नूतनीकरण करण्यासाठी कृषी साहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचेकडे संपर्क साधून त्वरित अर्ज करण्यात यावेत असे, आवाहन करण्यात आले  आहे.

अर्ज करण्याची पद्धत  निर्यातक्षम द्राक्ष बाग नूतनीकरणासाठी फक्त  अर्ज करण्याची गरज आहे. तर नव्याने नोंदणीसाठी विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२, ८अ, बागेचा नकाशा व ५० रुपये नोंदणी फी आवश्यक आहे. ‘ग्रेपनेट’व्दारे नोंदणी करण्याची अंतिम मुदत २९ नोव्हेंबरपर्यंत आहे. २०१९-२० हंगामात ३३, ४५१ निर्यातक्षम बागांची नोंदणी झालेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT