खेडी खुर्द, जि.जळगाव : शेतकरी शशिकांत पाटील यांच्या पूर्वहंगामी कापूस पिकात आढळलेली अळी.
खेडी खुर्द, जि.जळगाव : शेतकरी शशिकांत पाटील यांच्या पूर्वहंगामी कापूस पिकात आढळलेली अळी. 
मुख्य बातम्या

बोंडअळीप्रश्नी शेतकऱ्यांनी घाबरू नये ः तज्ज्ञ

टीम अॅग्रोवन

जळगाव ः जिल्ह्यात पूर्वहंगामी कापसाचे पीक ६० दिवसांचे होत आलेले असतानाच काही ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अळीच्या उत्पत्तीस कारणीभूत पतंग आढळले आहेत. त्यांची संख्या आटोक्‍यात आणता येईल. नुकसानीची टक्केवारी किती आहे हे स्पष्ट झालेले नाही. शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.  जिल्ह्यातील खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकरी शशिकांत डिगंबर पाटील यांच्या २४ मे रोजी लागवड केलेल्या कापसाच्या पिकात फिकट गुलाबी, लालसर अळी आढळली आहे. या अळीचे चित्रण व छायाचित्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कापूस पैदासकार डॉ. संजीव पाटील यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविले असता त्यांनी ही गुलाबी बोंड अळी असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु प्रादुर्भाव अजूनही मोठा नाही, तर भडगाव (जि.जळगाव) तालुक्‍यात पूर्वहंगामी कापसाच्या शेतात गुलाबी बोंड अळीसंबंधीचे पतंग आढळले. कापसाचे पीक अजून ७० दिवसाचे झालेले नाही. पतंग दरवर्षी जुलैत आढळतात. नुकसानीची पातळी किती आहे हे स्पष्ट नाही. ते पाहण्यासाठी कामगंध सापळे लावले पाहिजेत. शेतकऱ्यांनी घाबरू नये, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. कृषी विभाग म्हणतो, अमळनेरात अधिक समस्या कृषी विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार अमळनेर तालुक्‍यातील सात गावांमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव अधिक आहे. तसेच काही जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमध्येही ही समस्या असून कामगंध सापळे लावण्याचे आवाहन संबंधित शेतकरी, जिनर्सना केल्याचे सूत्रांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात भडगाव, अमळनेर, जळगाव इतर तालुक्‍यांमधील २२ ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचा दावाही कृषी विभागाने केला आहे. ती २२ गावे कोणती याचा खुलासा मात्र केलेला नाही. प्रतिक्रिया माझ्या शेतात पूर्वहंगामी कापसाच्या पिकात फुलामध्ये फिकट गुलाबी व लालसर अळी लवकर दिसू लागली आहे. - शशीकांत डिगंबर पाटील, कापूस उत्पादक, खेडी खुर्द, ता.जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

Department Of Water Resources : ‘कृष्णा खोरे’ची ६६८ कोटींची पाणीपट्टी वसुली

SCROLL FOR NEXT