equipment
equipment  
मुख्य बातम्या

शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना लॉकडाऊनधून वगळले

वृत्तसेवा

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता.३) लॉकडाऊनमधून शेतीसाठी लागणाऱ्या अवजारे आणि स्पेअरपार्टस् च्या दुकानांना सूट दिली आहे, यासंबंधीची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली आहे. त्यामुळे शेतकरी आणि अवजारे विक्री करणाऱ्या दुकानदारांना दिलासा मिळाला आहे.  ‘‘शेतीकामासाठी लागणारी यंत्रे, त्यांचे स्पेअरपार्टस् (पुरवठा साखळीसह) आणि यंत्रे दुरुस्तीची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनमधून या दुकानांना वगळण्यात आले आहे. महामार्गांवर दुरुस्तीची दुकाने, विशेषतः पेट्रोल पंपांवरील दुकाने आणि चहा उद्योग तसेच मळ्यांमध्ये कमाल ५० टक्के कर्मचाऱ्यांना काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु या कामांच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्यविषयक काळजी घेण्यात यावी,’’ असे जारी केलेल्या सूचनेत गृहसचिव अजय भल्ला यांनी म्हटले आहे. कृषी क्षेत्रातील खते, बियाणे, कीटकनाशके उद्योगाला लॉकडाऊनमधून आधीपासूनच वगळले होते. मात्र, कृषी अवजारे विक्रेते, दुरूस्ती करणारी दुकाने तसेच सुटया भागाची विक्री करणारे दुकाने उघडी ठेवण्यास बंदी होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

SCROLL FOR NEXT