अकोल्यातील कृषी विद्यापीठात ६ फेब्रुवारीला माजी विद्यार्थी महामेळावा
अकोल्यातील कृषी विद्यापीठात ६ फेब्रुवारीला माजी विद्यार्थी महामेळावा 
मुख्य बातम्या

अकोल्यातील कृषी विद्यापीठात गुरूवारी माजी विद्यार्थी महामेळावा

टीम अॅग्रोवन

अकोला : कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात अग्रणी असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नुकतेच स्थापनेचे ५० वर्षे पूर्ण केले. या सुवर्ण काळात हजारो कृषी पदवीधर निर्माण केले जे शेतीसह देश सेवेचा वसा जोपासत आहेत.या माजी विद्यार्थ्यांचा ६ फेब्रुवारीला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कृषी पदविका, माळीप्रशिक्षण, सेंद्रिय शेती अभ्यासक्रमांपासून तर कृषी, पशू विज्ञान, उद्यानविद्या, वनविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी जैवतंत्रज्ञान, अन्नतंत्रज्ञान आदी विषयांत पदवी, कृषी विद्या, कृषी रसायन व मृदविज्ञानशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, कृषी वनस्पतिशास्त्र, कृषी अर्थशास्त्र, कृषी विस्तार, कीटकशास्त्र, वनस्पती रोग शास्त्र, पशू संवर्धन व दुग्धशास्त्र, फळशास्त्र, भाजीपाला शास्त्र, प्रांगणविद्या व फुलशास्त्र, कृषी जैवतंत्रज्ञान, वनविद्या आदी विषयांत पदव्युत्तर व आचार्य पदवीप्राप्त केलेले या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आज देश विदेशात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी झाले   आहेत.  कधीकाळी अकोला व नागपूर या दोन शासकीय व अमरावती तथा वरोरा येथील संलग्न कृषी महाविद्यालयासह सुरू झालेला हा कृषी शिक्षणाचा महामेरू आज तब्बल १० शासकीय व २६ खासगी व २ संलग्न कृषी महाविद्यालयात विस्तारित झाला असून, आजवर ४८१९० कृषी पदवीधर निर्माण झाले आहेत जे उन्नत भारत निर्माणाचे शिलेदार म्हणून विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी कालखंडात शेती आणि शेतकरी केंद्र बिंदू मानून आपले सर्वोच्च योगदान देणाऱ्या समस्त आजी – माजी  कुलगुरू, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, कामगार, विद्यार्थी, विद्यार्थिनीचे योगदान लक्षणीय आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासि स्थापनेला  ५० वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्ताने राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे सहयोगाने  विद्यापीठाच्या आजी – माजी विद्यार्थ्यांचे भव्य दिव्य “माजी विद्यार्थी संमेलन २०२०” अर्थात “अँग्रीकॉस महामेळावा” येत्या ६ फेब्रुवारीला अकोला मुख्यालयी दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.  पशुसंवर्धन मंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन महामेळाव्याचे उद्‍घाटन महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री व या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी सुनील केदार यांच्याहस्ते व कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे अध्यक्षतेत होणार आहे. या प्रसंगी विद्यापीठाचे सर्व माजी कुलगुरू, तसेच मनोहर चंद्रिकापुरे, सिनेनट भारत गणेशपुरे यांची विशेष उपस्थिती आहे. सकाळी ८ ते १० वाजे दरम्यान नोंदणी व परिचय पत्र भरून देणे, सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान उद्‍घाटन सत्र पार पडणार आहे. उद्‍घाटनानंतर देश विदेशातील नोकरी उद्योगातील संधी, शेती व्यवसायातील नावीन्यपूर्ण उपक्रम आदी विषयांवर चर्चा होणार आहे. याप्रसंगी माजी विद्यार्थी परिचय, आपसी चर्चा, कलागुणांना वाब देणाऱ्या भरगच्च कार्यक्रमांचे दिवसभर आजोजन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT