खासगी बाजार समित्यांना ‘ई-नाम’ बंधनकारक
खासगी बाजार समित्यांना ‘ई-नाम’ बंधनकारक 
मुख्य बातम्या

खासगी बाजार समित्यांना ‘ई-नाम’ बंधनकारक

टीम अॅग्रोवन

पुणे: आॅनलाइन नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट (ई-नाम) आता खासगी बाजार समित्यांनादेखील बंधनकारक करण्यात येणार अाहे. ई-नाममधील समाविष्ट बाजार समित्यांमधील आडत्यांचे परवाने नूतनीकरण करताना त्यांना ई-नाम व्यवहार सक्तीचे करण्यात येणार आहेत. याबाबचे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. तर समाधानकारक काम न करणाऱ्या समित्यांवर कारवाईचेदेखील संकेत दिले आहेत. ई-नाममध्ये सहभागी झालेल्या राज्यातील ६० बाजार समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी संबंधित बाजार समित्यांचे पदाधिकारी आणि सचिवांची बैठक नुकतीच मंत्री देशमुख यांनी पुण्यात घेतली. या वेळी देशमुख म्हणाले, ‘‘ई-नाममध्ये सहभागी झालेल्या बाजार समित्यांनी काटेकाेर अंमलबजावणी करीत ई-नाममध्ये महाराष्ट्र देशात क्रमांक एकचे राज्य करण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या बाजार समित्या चांगले काम करतील, अशा बाजार समित्यांना प्राेत्साहनपर बक्षीस देण्यात यावीत. तर ज्या बाजार समित्यांचे कामकाज समाधानकारक हाेणार नाही, अशा बाजार समित्यांवर कारवाईदेखील करण्यात यावी, असे आदेश पणन मंडळ आणि पणन संचालनालयाला देण्यात आले आहेत.  तसेच संबधित ६० बाजार समित्यांमधील अडते आणि परवानाधारक खरेदीदारांनादेखील ई-नाम सक्तीचे करण्यात यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. तर जे अडते आणि खरेदीदार आॅनलाइन व्यवहार करतील त्यांना बाजार शुल्कात सवलत देण्यात यावी, अशीही सूचना मंत्री देशमुख यांनी पणन संचालनालय आणि पणन मंडळाला केली.  दृष्टिक्षेपात ई-नाम 

  •  ६० बाजार समित्यांचा समावेश 
  •  ३० बाजार समित्यांमध्ये ई-लिलाव सुरू 
  •  १७ समित्यांमध्ये शेतीमालाची गुणवत्ता तपासणी सुरू 
  •  दाैंड, वर्धा बाजार समित्यांमध्ये आॅनलाइन पेमेंट सुरू
  •  जानेवारीअखेर ५६ टक्के आॅनलाइन लिलाव 
  •  २ लाख २४ हजार ४८७ शेतकऱ्यांची ई-नाममध्ये नाेंदणी 
  •  ७ हजार ५७० व्यापाऱ्यांची नाेंद 
  •  ६,९९२ अडत्यांची नाेंद  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT