Emphasize reducing the production cost of turmeric; Expert opinion
Emphasize reducing the production cost of turmeric; Expert opinion 
मुख्य बातम्या

हळदीचा उत्पादन खर्च कमी करण्यावर भर द्या; तज्ज्ञांचे मत

टीम अॅग्रोवन

परभणी : ‘‘कमी पाण्यावर किफायतशीर उत्पादन मिळत आहे. हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल हळद पिकांकडे वाढला आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांत हळद लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे कीड रोगाचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यावर भर द्या,’’ असा सूर सोमवारी (ता. २३) आयोजित तज्ज्ञांच्या ‘शेतकरी- शास्त्रज्ञ सुसंवाद’ कार्यक्रमात उमटला. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ‘हळद उत्पादन व प्रक्रिया’ या विषयावर हा कार्यक्रम झाला. विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर अध्यक्षस्थानी होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, कृषी कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. डी. बंटेवाड, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे, तोंडापूर (जि. हिंगोली) येथील कृषी विज्ञान केंद्रातील उद्यानविद्या विशेषज्ञ अनिल ओळंबे, प्रा. डी. डी. पटाईत, डॉ. मीनाक्षी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

संतोष आळसे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांमध्ये पीक लागवड तंत्रज्ञान, व्यवस्थापन, याबाबत जनजागृती करण्यासाठी कृषी विभाग, आत्मा, कृषी विद्यापीठातर्फे अशा कार्यक्रमाचे आयोजन नियमितपणे करणे गरजेचे आहे.’’

डॉ. देवसरकर म्हणाले, ‘‘हळदीच्या उत्पादन वाढीसाठी योग्य जमीन, दर्जेदार बेणे, अन्नद्रव्य, पाणी, कीड रोगाचे व्यवस्थापन वेळीच करणे आवश्यक आहे. अनुभवातून शेतीमध्ये स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करणारे शेतकरी हेच खरे शास्त्रज्ञ आहेत.’’

ओळंबे म्हणाले, ‘‘सुधारित लागवड तंत्रज्ञामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. परंतु, किफायतीशर उत्पादनासाठी उत्पादन खर्चदेखील कमी करण्यावर लक्ष देण्याची गरज आहे. अतिरिक्त पाणी दिल्यामुळे कंदकुज रोगाचा प्राद्रुर्भाव होत आहे. बुरशीजन्य करप्यामुळे उत्पादनात घट येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी, अन्नद्रव्य तसेच कीड रोगाचे वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.’’

प्रा. पटाईत यांनी कीड व्यवस्थापनाबत, तर डॉ. पाटील  यांनी रोग व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. डॉ. एस. जी. पुरी यांनी सूत्रसंचालन केले. योगेश पवार यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT