अकरा हजार मेट्रिक टन चाऱ्याची तूट
अकरा हजार मेट्रिक टन चाऱ्याची तूट 
मुख्य बातम्या

अमरावती विभागात अकरा हजार टन चाऱ्याची तूट

टीम अॅग्रोवन

अमरावती : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत असलेल्या २५ लाख ३६ हजार पशुधनासाठी लागणाऱ्या ११,०२८ मेट्रिक टन चाऱ्याची तूट भरून काढण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने नियोजन केले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पाणी आणि चारा टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

अमरावती विभागात अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. विभागातील दुष्काळी २८ तालुक्‍यांत २० लाख ३५ हजार ७६४ पशुधन आहे. जून २०१९ पर्यंत १९,४३, ८८७ मेट्रिक टन चारा या जनावरांना लागणार आहे. मात्र, १९,५४,९१५ मेट्रिक टन चाऱ्याचीच उपलब्धता होणार आहे. त्यामुळे ११,०२८ मेट्रिक टन चाऱ्याची तूट भासणार आहे. 

पाऊसमान चांगले आणि पशुधन कमी असलेल्या अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात चाऱ्याची तूट भासणार नसल्याचे सांगितले जाते. परंतु अमरावती जिल्ह्यात १,००,५५६, बुलडाणा जिल्ह्यात १,८३,५३० मेट्रिक टन चाऱ्याची तूट भासेल. राज्यातील दुष्काळी गावात पाणी टंचाईस वैरणटंचाईची समस्या असल्याने गावपातळीवरच चाऱ्याची उपलब्धता करण्यावर भर दिला जात आहे. गाळपेर क्षेत्र हा पर्याय समोर येत आहे. 

दोन हजार १३५ अर्ज

विभागात ७,३६० हेक्‍टर गाळपेर खेत्रात ६३९ क्‍विंटल मका, ५१६ क्‍विंल ज्वारी, ८८ क्‍विंटल बाजरी व १४ क्‍विंटल न्युट्रिफिड बियाण्यांची आवश्‍यकता आहे. यासाठी विभागात २,१३५ अर्ज पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले. राज्यासाठी उपलब्ध १० कोटींमधून विभगात राष्ट्रीय कृषी विकास योजनूेन ४५६ क्‍विंटल मका बियाणे प्राप्त आहे. यामध्ये ४५,६४५ हिरवी वैरण व ज्वारीसाठी ५४२ क्‍विंटल बियाणे प्राप्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT