देऊर, ककाणीत ‘सिंगल फेज’अभावी शेतकरी अंधारात
देऊर, ककाणीत ‘सिंगल फेज’अभावी शेतकरी अंधारात  
मुख्य बातम्या

देऊर, ककाणीत ‘सिंगल फेज’अभावी शेतकरी अंधारात

टीम अॅग्रोवन

देऊर, जि. धुळे : देऊर (ता. धुळे) व ककाणी (ता. साक्री) संलग्न असलेल्या शेती शिवारात रात्री घरासाठी देण्यात येणारा सिंगल फेज वीजपुरवठा गेल्या काही दिवसांपासून बंद केला आहे. यामुळे शेतात वास्तव्यास असणाऱ्या शंभरावर शेतकरी व जागल्यांची कुटुंबे अंधारात आहे. शिवारात बिबट्या, रानडुक्कर, तरस आदी वन्यप्राण्यांचा वावर असून, पूर्वीप्रमाणे सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

येथील शिवारातील शेतकऱ्यांची शेती धुळे व साक्री तालुक्‍यातील सीमारेषेवर आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. ‘नको ती शेती’ अशी म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सिंगल फेज वीजपुरवठ्याचे अधिकृत वीजजोडणी घेतली आहे. आत्तापर्यंत सिंगल फेज विजेचे बिल येथील शेतकऱ्यांनी भरणा केला. कृषिपंपासाठी रात्री जेवढी वीज आली, तेवढीच वीज रात्री पाहायला मिळते अन्यथा सर्वत्र अंधारच असतो. आवश्‍यक संपर्क असणारा मोबाईल चार्जिंग होत नाही. अंधाराचा फायदा घेत बिबट्या थेट जनावरांना हल्ला करीत आहे. वीज कंपनीचे अधिकारी सांगतात, या शिवारातील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठी विशेष डिझाईन ट्रान्सफॉर्मर (एसडीटी) हवा. यापूर्वी या सिंगल फेजसाठी नेर वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जात होता. मात्र ओव्हरलोडमुळे अतिरिक्त भार म्हसदी, चिंचखेडे येथे जोडण्यात आला आहे. या उपकेंद्राअंतर्गत या शिवारासाठी विशेष ट्रान्सफॉर्मर (एसडीटी) उपलब्ध नाही. त्या कारणास्तव हा वीजपुरवठा खंडित झाला आहे.  प्रतिक्रिया.. शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. सिंगल फेज वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचा फायदा घेत वन्यप्राणी पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहे. शेती करणे अवघड झाले आहे. समस्या दूर व्हावी हीच अपेक्षा आहे.  - बारकू शंकर बेडसे : शेतकरी, देऊर (जि. धुळे) वीज कंपनीला निवेदन  कुडाशी (ता. साक्री) येथे कायमस्वरूपी पूर्णवेळ सिंगल फेज वीजपुरवठा मिळावा या संदर्भात, वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता पी. ए. घोलप यांना शिवसेनेच्या पिंपळनेर शाखेतर्फे निवेदन देण्यात आले. पश्‍चिम पट्ट्यात,  चरणमाळ, उंबरफाटा, नांदर्की, बसरावळ या सदर गावांना होणारा वीज पुरवठा पुरेसा स्वरूपाचा नसून रात्रीच्या वेळी ही गावे अंधारमय वातावरणात असतात. त्यामुळे या गावांना पूर्णवेळ स्वरूपाची वीजपुरवठा करून गावे प्रकाशमय करावी. पूर्णवेळ स्वरूपाचा विद्युत पुरवठा केल्यामुळे गावातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल तसेच रात्री -अपरात्री जनावरांपासून संरक्षण होण्यास मदत होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT