Election of Sindhudurg District Bank finally announced
Election of Sindhudurg District Bank finally announced 
मुख्य बातम्या

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक अखेर जाहीर

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर न्यायालयात प्रलबिंत दाव्यांमुळे लांबलेली जिल्हा बँकेची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. येत्या ३० डिसेंबरला मतदान होईल. ३१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला मुदत वाढ मिळाली होती. त्यानंतर सहकारी विभागाने निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरवात केली. मतदार याद्या देखील तयार करण्यात आल्या. परंतु मतदार असलेल्या काही अपात्र ठरलेल्या संस्थांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली होती. दोन, तीन दिवसांपूर्वी न्यायालयाने संस्थांनी नोंदविलेले अपील फेटाळून लावले. 

सहकार विभागाने बनविलेल्या मतदार याद्या बिनचूक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सोमवारी (ता. २९) सायंकाळी निवडणूक अधिकारी वंदना खरमाळे यांनी निवडणूक जाहीर केली. येत्या ३० डिसेंबर रोजी मतदान होईल. ३१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

जिल्हा बँकेच्या १९ संचालकांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये तालुकानिहाय संस्था गटातून आठ संचालक असतील. या शिवाय दोन महिला प्रतिनिधी, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मतदारसंघातून एक, इतर मागास प्रवर्गातून एक, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातून एक, निवडून द्यायचे आहेत. या शिवाय जिल्हा मतदारसंघातून सात संचालक निवडून द्यायचे आहेत. एकूण ९८२ सभासद संस्था मतदार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT