वाशीममध्ये  मानवी साखळीतून साकारले निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह
वाशीममध्ये मानवी साखळीतून साकारले निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह 
मुख्य बातम्या

वाशीम : मानवी साखळीतून साकारले निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह

टीम अॅग्रोवन

वाशीम : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा म्हणून मतदार जागृतीसाठी वाशीम येथील पोलिस कवायत मैदानावर मंगळवारी (ता. १५) सुमारे ११ हजार विद्यार्थी, महिलांनी एकत्र येत मानवी साखळीतून भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह (लोगो) साकारला. ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये जागतिक विक्रम म्हणून या उपक्रमाची नोंद झाली असून, यामुळे वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.  दरम्यान, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, अंगणवाडीसेविका, बचत गटातील महिला, आशा कर्मचारी, महिला यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हामध्ये असलेल्या हिरवा, पांढरा, केशरी, काळा व करड्या रंगाच्या टोप्या परिधान करून सर्व विद्यार्थी, महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.

सलग तिसऱ्या वर्षी जागतिक विक्रमाची नोंद मतदार जागृतीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने आयोजित केलेल्या उपक्रमात सुमारे ११ हजार विद्यार्थी, महिलांनी सहभाग घेतला. या विक्रमाची जागतिक विक्रम म्हणून ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने नोंद घेतली आहे. प्रशासनामार्फत सलग तिसऱ्या वर्षी जागतिक विक्रम नोंदविला गेला आहे. यापूर्वी २६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ७ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मानवी साखळीद्वारे ‘स्वच्छ भारत अभियान’चा लोगो (महात्मा गांधी यांचा चष्मा) साकारला होता. त्यानंतर ८ मार्च २०१८ रोजी ८३१८ महिला व मुलींनी मानवी साखळीतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान’चा लोगो साकारून विक्रम स्थापित आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT