मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती
मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती 
मुख्य बातम्या

मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती

टीम अॅग्रोवन

मुंबई : ओला दुष्काळ हाताळण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आज (शरिनवारी) बैठक बोलाविण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे या समितीचे सदस्य आहेत. एकनाथ शिंदे आज या बैठकीला आले नाहीत. शिंदे यांनी अनुपस्थित राहून आपली नाराजी स्पष्ट दर्शविली आहे. तसेच त्यांनी सरकारी कामकाजावर बहिष्कार टाकल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे मराठवाड्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. याचा अर्थ शिवसेनेची नाराजीची भूमिका सरकारच्या कारभारात आणल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात अद्याप सत्तेबाबत एकवाक्यता झालेली नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री आमचाच यावर ठाम आहेत. आता शिवसेनेने सरकारी कामकाजावर बहिष्कार टाकल्याने युतीतील तणाव आणखी वाढला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT