Eight and a half thousand quintals of gram paid to farmers in Aurangabad district
Eight and a half thousand quintals of gram paid to farmers in Aurangabad district 
मुख्य बातम्या

औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५०० क्विंटल हरभऱ्याचे चुकारे अदा

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून १०२४० क्विंटल मक्‍याची हमी दराने खरेदी करण्यात आली आहे. त्यापैकी ८ हजार ९८४ क्विंटल हरभऱ्याचे चुकारे अदा करण्यात आले, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात हमी दराने खरेदीसाठी ५ केंद्रे सुरू करण्यात आली होती. या केंद्रांवर २५ मार्च ते ३० जूनपर्यंत नोंदणीची मुदत होती. तर, १५ जुलैपर्यंत खरेदी सुरू होती. या खरेदीच्या मुदतीत पाच केंद्रांवरून ११३० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती.

नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीचे संदेश पाठविण्यात आले. त्यापैकी ९६३ शेतकऱ्यांकडील १०२४० क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. त्यामध्ये गंगापूरच्या केंद्रावरून ५३० शेतकऱ्यांकडील ५ हजार ७२३ क्विंटल ५० किलो, औरंगाबाद केंद्रावरून ६१ शेतकऱ्यांकडील ८५७ क्विंटल, खुलताबाद केंद्रावरून ३३९ शेतकऱ्यांकडील ३ हजार ७१ क्विंटल, तर सोयगावच्या केंद्रावरून ३३ शेतकऱ्यांकडील ५८८ क्विंटल खरेदी केलेल्या हरभऱ्याचा समावेश आहे.

गंगापूर केंद्रावरील ४६४ शेतकऱ्यांना त्यांच्या पाच हजार ८२ क्विंटल ५० किलो, औरंगाबाद केंद्रावरील ६१ शेतकऱ्यांच्या ८५७ क्विंटल ५० किलो, खुलताबाद केंद्रावरील २९२ शेतकऱ्यांच्या २६८४ क्विंटल व सोयगाव केंद्रावरील १५ शेतकऱ्यांच्या ३६० क्विंटलचे ८३२ शेतकऱ्यांच्या १९८४ क्विंटल हरभऱ्याच्या चुकऱ्यापोटी ४ कोटी ३७ लाख ९७ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT