nashik
nashik  
मुख्य बातम्या

शेतमाल विक्रीची साखळी व्यापक करण्यासाठी प्रयत्न: कृषिमंत्री भुसे 

टीम अॅग्रोवन

नाशिक: भविष्यात 'शेतकरी ते ग्राहक' या संकल्पनेतून शेतमाल विक्रीची साखळी तयार व्हावी, यातून शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल. अडचणीच्या काळात शहरातील ग्राहकांनाही योग्य दरात उपलब्ध होईल, या उद्देशाने ही संकल्पना व्यापक स्वरूपात करण्यासाठी कृषी विभाग पुढाकार घेणार आहे, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शुक्रवार (ता.२४) आठ वाहनांमधून २० टन द्राक्षे व भाजीपाला थेट मुंबई व उपनगरांमधील ग्राहकांसाठी रवाना करण्यात आला. यावेळी कृषिमंत्री दादा भुसे बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, गोकुळ वाघ, कैलास खैरनार, संजय सुर्यवंशी, आत्मा प्रकल्प उपसंचालक कैलास शिरसाठ, दिंडोरीचे तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे उपस्थित होते. 

यावेळी कृषिमंत्री म्हणाले की, मोठ्या कष्टाने पिकविलेला शेतमाल थेट ग्राहकांच्या दारातपर्यंत पोहचविण्याचा उपक्रम यापूर्वीही सुरू होता. लॉकडाऊनमुळे शेतकरी मोठा अडचणीत आला. त्यामुळे अचानक दर पडले. अशा परिस्थितीत कृषि विभागाने शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. 

याबाबत कृषिमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी, मंत्रालयातील प्रशासकीय अधिकारी, सचिव कृषी, पणन विभागाचे अधिकारी यांच्या समन्वयातून द्राक्ष थेट ग्राहकांना विक्री करण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार हा उपक्रम जिल्ह्यातून सुरू झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

शेतकरी अडचणीत, त्याच्या पाठीमागे खंबीर उभे रहा  कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्याला स्वत:चा माल थेट विक्री करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या शेतकरी अडचणीत आहे, त्याच्या पाठीमागे खंबीर उभे रहा. शेतकऱ्याचा भाजीपाला, फळे विकत घ्या. ज्यांची परिस्थिती नसेल अशांना सेवाभाव वृत्तीतून खरेदी करून मोफत द्या,असे आवाहनही श्री.भुसे यांनी केले.  उपक्रमात या शेतकरी कंपन्यांचा प्रत्यक्ष सहभाग 

  • श्री.श्री.सेंद्रीय फळे व भाजीपाला उत्पादक गट,उगाव,(ता.निफाड) 
  • श्री.कृष्णा भाऊसाहेब जाधव,सारोळे,(ता.निफाड) 
  • ओम गायत्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी,निफाड 
  • श्री विघ्नहर्ता फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी.उगाव,(ता.निफाड) 
  • सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी,मोहाडी,(ता.दिंडोरी) 
  • ग्रीन फिल्ड अग्रो सर्व्हिसेस,नाशिक 
  • दिंडोरी प्रणित फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी,दिंडोरी 
  • वसुंधरा सेंद्रीय शेतमाल उत्पादक शेतकरी गट,वडगाव,(ता.सिन्नर) 
  • बळीराजा शेतकरी उत्पादक गट,जोगलटेंभी 
  • जनगंगा फाऊंडेशन,देवरगाव,(ता.चांदवड) 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

    Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

    Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

    Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

    Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

    SCROLL FOR NEXT