Effectively implement the Chief Minister's Employment Generation Plan: Dr. Mhaisekar
Effectively implement the Chief Minister's Employment Generation Plan: Dr. Mhaisekar 
मुख्य बातम्या

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजना प्रभावीपणे राबवा : डॉ. म्हैसेकर

टीम अॅग्रोवन

पुणे :‘‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेतून पुढील पाच वर्षांत सुमारे १ लाख सुक्ष्म व लघु उपक्रमाच्या माध्यमातून एकूण १० लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यामधून तरुणांमधील उद्यमशिलतेला प्रोत्साहन मिळेल. ही योजना प्रभावीपणे राबवावी,’’ असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. 

विभागीय आयुक्तालय आणि महाराष्ट्र उद्योजकता केंद्रातर्फे मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमातंर्गत विभागीय कार्यशाळेचे उद्‌घाटन डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, संगणकप्रणाली विकसक तज्ज्ञ विजय जाधव, उद्योग संचालनालयाचे अधीक्षकीय उद्योग अधिकारी सुरेश लोंढे, पी. डी. रेंदाळकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे सहयोगी सरव्यवस्थापक अभिनव काळे, उद्योजकता केंद्राचे विभागीय अधिकारी मदनकुमार शेळके, यू. डी. क्षीरसागर आदी उपस्थित होते. 

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘‘तरुणांमधील उद्यमशिलता वाढीसाठी सहाय्यभूत ठरणारी सर्वसमावेशक आणि प्रोत्साहन देणारी महत्त्वाकांक्षी अशी ही योजना आहे. त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्यासाठी, सुलभ वित्तपुरवठा उपलब्ध करून स्थानिक तरुणांना स्वयं-रोजगाराकडे आकर्षित करणे शक्य होईल. यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.’’

अभिनव काळे, सरेश लोंढे, पी. डी. रेंदाळकर यांनी सादरीकरण केले. या कार्यशाळेस अंमलबजावणी यंत्रणा, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT