कपाशी नुकसान
कपाशी नुकसान 
मुख्य बातम्या

कपाशीचे पीक बोंडअळीच्या घशात

सकाळ वृत्तसेवा

किनगाव ः कापूस राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पीक असून नैसर्गिक आपत्तीने जिल्हाभरातील उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आले आहेत. प्रतिकूल हवामानामुळे यंदा कापसाच्या उत्पन्नात घट झाली आहे. बी. टी. संकरित वाणाच्या सर्व कंपनीच्या पिकावर सध्या ठिपक्‍याच्या बोंडअळीने थैमान घातले आसून कापूस लागवड शेतकरी चिंतेत आहेत. किनगावसह सोणवणेवाडी, हंगेवाडी, चाटेवाडी, सिरसाठवाडी, कोळवाडी, दगडवाडी या गावांतील जवळपास शंभरावर शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. खत व फवारणी खर्च करून, विद्युत पुरवठ्याच्या अनंत अडचणीला सामोरे जाऊन पाणी देऊन कापसाचे पीक जगवले. या वर्षी बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे पंचाहत्तर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या सहकार्याने बोंडअळी प्रभावित शेतीचे पंचनामे करणे चालू झाले आहेत. दरम्यान, जिल्हाभरात कापसाची हीच स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

SCROLL FOR NEXT