पावसामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले
पावसामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले  
मुख्य बातम्या

मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यात ४२१ पैकी ३०१ मंडळांत मंगळवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत हलका ते जोरदार पाऊस झाला. जालना, परभणी, लातूर, बीड जिल्ह्यांतील ७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सततच्या पावसामुळे शेतामध्ये कापून ठेवलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. ज्वारीची कणसे काळी पडली. बोंडातून फुटलेला कापूस जमिनीवर गळून पडला. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले. 

बोंडातील कापसाची वेचणी करणे कठीण झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, देगलूर, लोहा, मुखेड, कंधार, बिलोली, मुदखेड, नांदेड, भोकर, उमरी, धर्माबाद आदी तालुक्यातील अनेक मंडळे, परभणी तालुक्यातील पिंगळी मंडळातील कारेगाव, पूर्णा तालुक्यातील लिमला, ताडकळस, पूर्णा, चुडावा, कात्नेश्वर, सेलू तालुक्यातील सेलू, देऊळगाव, वालूर, चिकलठाणा, कुपटा, पाथरी तालुक्यातील पाथरी, हदगाव, पालम, गंगाखेड, जिंतूर, सोनपेठ, परभणी तालुका, हिंगोली जिल्ह्यातील वसतम, कळमनुरी, औंढानागनाथ, सेनगाव, हिंगोली तालुक्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ३१, तर जालना जिल्ह्यातील सर्व ४९ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी आणि अंबड तालुक्यांतील वडीगोद्री मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी ३४, तर हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी ३, नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ४०, लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ५१, उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३५, तर बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ५८ मंडळांत  हलका ते जोरदार पाऊस झाला. वडवणी आणि कौडगाव मंडळामध्ये अतिवृष्टी झाली.

मंडळनिहाय पाऊस (२० मि.मी पुढे) :

औरंगाबाद जिल्हा पाचोड २६, विहामांडवा ३६
जालना जिल्हा जालना २०, विरेगाव २५, पाचन वडगाव २०, वाग्रुळ जहागीर ३०, बावणे पांगरी २५, सिपोरा बाजार ३१, पिंपळगाव रेणुकाई ३०, केदारखेडा ४०, अनवा ४५, जाफराबाद ३७, टेंभुर्णी ७४, कुंभार झरी ४०, वरुड ३५, माहोरा ३८, परतूर  ३२, तळणी २३, जामखेड २०, वडीगोद्री ८१, गोंदी ४२, रोहिलगड २२, कुंभारपिंपळगाव २७, अंतरवेली ३४
परभणी जिल्हा सावंगी म्हाळसा २९, बामणी ७५, देऊळगाव ३५, गंगाखेड ३६, महातपुरी २०, आवलगाव २६, बनवस २०.
लातूर जिल्हा औसा २१, किल्लारी ३९, मातोळा २८ , पोहरगाव ३०, कारेपूर २६, नळगीर २५, नागलगाव २०, किनगाव २७, खंडाळी २५, चाकूर ९०, वडवळ नागनाथ ७४, नळेगाव २८, शेळगाव २२, कासार शिर्शी २९, मदनसुरी ३०, कासारबालकुंदा २१ 
उस्मानाबाद जिल्हा नळदुर्ग २०, मंगरुळ २०, इटकळ ४८, मुरुम २१, नागजरवाडी ३५, डाळिंब २४,  माकणी २९, शिराढोण २५,  गोविंदपूर २४ 
बीड जिल्हा बीड ४०, राजुरी ४४, मांजरसुंभा ५१, नेकनूर ३१, नाळवंडी ३७, पाली ३७, म्हळसजवळा २२, गेवराई ३०, धोंडराई ४२, उमापूर ५३, चकलंबा ४७, जातेगाव २०, सिरसदेवी २५, तिंतरणी २२, वडवणी ९८, कौडगाव १०३, माजलगाव ४२, गंगामसला ६०, दिंद्रुड २५, नित्रुड ५२, तालखेड ६०, किट्टी आडगाव ५०, केज ३५, विडा २२, बनसारोळा २२, धारुर ४४, मोहखेड ३६, तेलगाव ३९, परळी ४२, धर्मापुरी २०, पिंपळगाव गाढे २९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT