The economic cycle will continue as we fight Corona Take care of this: Guardian Minister Bhujbal
The economic cycle will continue as we fight Corona Take care of this: Guardian Minister Bhujbal 
मुख्य बातम्या

कोरोना’शी लढताना अर्थचक्र सुरू राहील याची दक्षता घ्या ः पालकमंत्री भुजबळ

टीम अॅग्रोवन

नाशिक : कोरोनाची लढाई दीर्घकाळ चालणारी आहे. यात शासन, प्रशासनासमोर दोन प्रकारची आव्हाने आहेत. संसर्ग नियंत्रणात आणण्यासोबत सर्व प्रकारचे व्यवहार सुरू ठेवून अर्थचक्र कसे सुरळीत चालू राहील, याची दक्षता घ्यावी , अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार (ता.७) झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक शहर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, आरोग्य उपसंचालक पट्टनशेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते. 

मंत्री भुजबळ म्हणाले, ‘‘कोरोना ग्रामीण भागातही पोहोचला आहे. तो जास्त पसरणार नाही, याची खबरदारी घ्यावी. दुकाने उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळांबाबत गर्दी टाळता येईल व नागरिकांचीही सोय होईल, असा निर्णय पोलिस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा.’’ उपस्थित अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कोरोनाची सद्य:स्थिती व त्यावरील उपाययोजनांची माहिती सादर केली.  जबाबदाऱ्या केल्या निश्चित 

कोरोनाचा वाढता प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी मालेगावमधील परिस्थितीवर जिल्हाधिकारी, नाशिक शहरातील बाधित क्षेत्रावर महापालिका आयुक्त, तर येवला तालुका व परिसरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रीत करुन समन्वयकाची भूमिका पार पाडावी, असे भुजबळ यांनी सांगितले.  दृष्टिक्षेपात आढावा 

  • प्रलंबित स्वॅबच्या नमुन्यांचे अहवाल तात्काळ प्राप्त करा 
  • मालेगाव पाठोपाठ येवल्यावर विशेष लक्ष केंद्रीत करून स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमा 
  • दुकानांच्या वेळांबाबत गर्दी व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने फेरविचार करावा 
  • कायद्याची अंमलबजावणीवेळी स्थलांतरितांना मानवतेची वागणूक द्या 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

    Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

    Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

    SCROLL FOR NEXT