In the eastern part of Nashik Manikpunj Dam full 
मुख्य बातम्या

नाशिकच्या पूर्व भागातील माणिकपुंज धरण तुडुंब

नाशिक : जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपूर्वी सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पूर्व भागात सरासरीपेक्षा जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणी होऊन नदी, नाले खळाळले आहेत.

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपूर्वी सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पूर्व भागात सरासरीपेक्षा जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणी होऊन नदी, नाले खळाळले आहेत. यामध्ये उशिरा का होईना पूर्व भागातील नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण शुक्रवारी (ता.२०) सकाळी ९.१५ वाजता तुडुंब झाले.

जिल्ह्यातील एकूण २४ मोठ्या व मध्यम प्रकल्पांत ३७, ७२३ दलघफू उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ६१ टक्क्यांवर आहे. मागील वर्षी हाच पाणीसाठा ६९ टक्के होता. मागील वर्षाच्या तुलनेत ८ टक्क्यांनी जलसाठ्यात तूट आहे. मात्र भावली, वालदेवी, हरणबारी व माणिकपुंज ही धरणे १०० टक्के भरली आहेत. 

जिल्ह्याच्या पूर्व भागात संततधार पावसामुळे माणिकपुंज धरण ओसंडून वाहू लागले. या धरणाचा ३३५ दलघफु संकल्पित उपयुक्त पाणीसाठा आहे. नांदगाव तालुक्यात सरासरी पाऊस ७१.५ मिमी इतका आहे. तुलनेत ४ दिवसांत १२३.२ मिमी पाऊस झाल्याने १७२.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातील जळगाव बुद्रूक, जळगाव खुर्द, पिंपरखेड, साकोरे, रणखेडा, परधाडी, पिंपरी हवेली, राज देहरे आदी भागातील शेतकरी आनंदी आहेत.    

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance: प्रशासनाच्या सूक्ष्मनियोजनामुळे नांदेडला सर्वाधीक पीकविमा

Jal Samruddha Abhiyan: जलसमृद्ध अभियानातील गावांचा विकास आराखडा तयार करा; आमदार पवार

Baliraja Farm Road Scheme: बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेंतर्गत कामांना गती द्यावी : पालकमंत्री पाटील

Mahavistar AI App: अकोला तालुक्यात ‘महाविस्तार एआय’ ॲपबाबत जनजागृती मोहीम

Onion Farmers in Crisis: कांदा उत्पादक शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT