Digital Farming: स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने महाविस्तार एआय ॲपबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती व प्रचार-प्रसिद्धी मोहीम हातात घेण्यात आली आहे. मोहिमेचा एक भाग म्हणून बोरगाव मंजू येथे एकाच वेळी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत ॲप डाऊनलोड करण्यासह माहितीचा प्रसार केला. .या मोहिमेअंतर्गत अकोला तालुका कृषी विभागातील ३५ जणांच्या पथकाने बोरगाव मंजू येथे दिवसभर शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. शेतकऱ्यांना महाविस्तार एआय ॲपची माहिती देत त्याचे उपयोग समजावून सांगितले.या उपक्रमात पथकाने जवळपास ४०० शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाऊनलोड करून दिले..Mahavistar AI app: सांगलीत महाविस्तार ॲपवर सतरा टक्केच नोंदणी.ॲपच्या माध्यमातून पीक व्यवस्थापन, रोगनियंत्रण, हवामान अंदाज, शासकीय योजना व तांत्रिक मार्गदर्शन यांची माहिती सहज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले..Mahavistar AI App: ‘महाविस्तार एआय’कडे दुर्लक्ष; नोंदणीला मंद गती.तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांच्या नेतृत्वात ही मोहीम गावपातळीवर पोहोचविली जात आहे. अशा प्रकारच्या मोहिमा पुढील काळातही राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री. भोर यांनी दिली..आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांपर्यंत नवतंत्रज्ञान पोचविण्यासाठी, एआयॲपची माहिती पोचविण्यासाठी आता प्रत्येक मंडळात अशा मोहिमा राबवणार आहोत. कृषी खात्याच्या योजना, खरिपाच्या दृष्टीने जनजागृतीचे काम प्रत्येक गावात कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी करतील.प्रवीण भोर, तालुका कृषी अधिकारी, अकोला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.