Micro Planning in Crop Insurance: प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्गत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी पीक कापणी प्रयोगाचे सूक्ष्मनियोजन केले. तीन यंत्रणांच्या माध्यमातून सर्व पीक कापणी प्रयोग वस्तुनिष्ठ पद्धतीने होतील याची खबरदारी घेतल्यामुळे नांदेडला सर्वाधीक ८१३ कोटींचा विमा मंजूर झाला आहे. यात अद्याप २१ मंडळाची रक्कम बाकी असल्याने विमा ९०० कोटींपेक्षा अधिक जाणार आहे..नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्ंगत खरीप हंगाम २०२५ मध्ये चार लाख ३४ हजार ८१९ शेतकर्यांनी आठ लाख २९ हजार ७३७ विमा अर्ज दाखल केले होते. हा विमा पाच लाख १३ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा उतरविला होता. दरम्यान ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी झाल्यामुळे ७ लाख २७ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते..Crop Insurance Nanded: नांदेडला ८१३.८७ कोटींचा पीकविमा परतावा मंजूर .यात जिल्ह्यात पिकांचे ३३१२ पीक कापणी प्रयोग नियोजित होते. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला सुधारित पीक विमा योजनेनुसार उंबरठा उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाई या एका घटकातंगर्त ८१३.९३ कोटी मंजूर झाली. सध्या मंजूर नुकसान भरपाई प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पोर्टलवरून ऑनलाइन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. नुकसानग्रस्तांना विमा संरक्षण मिळावे यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी पीक कापणी प्रयोगाचे सूक्ष्मनियोजन केले,.Crop Insurance Payout: कापणी प्रयोगातील उत्पादनाधारेच पीकविमा भरपाई द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी.तसेच तिन्ही यंत्रणांचा समन्वय साधला. महसूल, ग्रामविकास व कृषीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व पीक कापणी प्रयोग वस्तुनिष्ठ पद्धतीने होतील याची खबरदारी घेतली. यामुळे नांदेड जिल्ह्याला राज्यात सर्वाधीक ८१३ कोटींचा पीकविमा मंजूर झाला आहे. यात जिल्ह्यात २१ मंडळातील शेतकर्यांची रक्कम मिळणे बाकी आहे. यामुळे जिल्ह्यात ९०० कोटींपेक्षा अधिकचा विमा नांदेडला मिळणार आहे..अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विमाधारकांना विमा भरपाई मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली पीक कापणी प्रयोग तीनही विभागांच्या समन्वयातून पारदर्शकरीत्या वस्तुनिष्ठ पद्धतीने केले. काही मंडळात प्रयोगावर कंपनीकडून घेण्यात आलेल्या आक्षेपाचे सुकाणू समितीच्या सभेत निराकरण केले. यामुळे नांदेडला चांगली विमा नुकसान भरपाई रक्कम मिळण्यास मदत झाली आहे.दत्तकुमार कळसाईत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.