Early decision for rehabilitation of tribal settlements: Bhuse
Early decision for rehabilitation of tribal settlements: Bhuse 
मुख्य बातम्या

आदिवासी वस्तीच्या पुनर्वसनासाठी लवकर निर्णय : भुसे

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘‘शेतकरी असो वा शेतमजूर यांची प्रगती कशी होईल, त्या दृष्टिकोनातून कामकाज करणे, ही आमची जबाबदारी आहे. येणाऱ्या काळात आदिवासी भागातील ग्रामस्थांना सोयीसुविधा कशा उपलब्ध होतील, यावर लक्ष केंद्रित करू. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करू. शेती महामंडळाच्या जागेवरील आदिवासी वस्तीच्या पुनर्वसनासाठी राज्यपातळीवर लवकर निर्णय होईल. त्यानुसार काष्टी येथील आदिवासींना न्याय मिळेल,’’ असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

काष्टी (ता. मालेगाव) येथे जनसुविधेद्वारे सुमारे ६५ लाखांची, तर ठक्कर बाबा योजनेतून ७ लाख अशा विविध विकास कामांचे भूमीपूजन भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, सरपंच उषाबाई खैरनार, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, नायब तहसीलदार विकास पवार,धनराज निकम, वसंत हिरे, गोकूळ सूर्यवंशी, बबन सोनवणे, अनिल बच्छाव, भरत खैरनार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘‘महादेव कोळीसह इतरही काही जातीचे लोक आहे, ज्यांचा जातीच्या दाखल्यासंदर्भातील प्रश्न प्रलंबित आहे. ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल, अशी पाच कृषी महाविद्यालये ही काष्टी येथील शेती महामंडळाच्या जागेवर साकारण्यात येत आहेत. त्यामुळे काष्टीचे नाव हे संपूर्ण राज्यभरात पोचेल. काष्टी येथील कृषी महाविद्यालयाच्या बांधकामाला लवकरच सुरवात होईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT