संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

प्रत्येक गावाला ग्रामपंचायत कार्यालय मिळणार ः पंकजा मुंडे

टीम अॅग्रोवन

मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत कार्यालय व महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना महाराष्ट्र शासनाकडून ग्रामपंचायत कार्यालयासाठी १२ लाख रुपये निधी देणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी राज्यमंत्री दादा भुसे हेदेखील उपस्थित होते.

यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती मुंडे यांनी या वेळी दिली. यासोबतच ग्रामीण भागात महिलांच्या सक्षमीकरणासाठी देखील योजनेला मान्यता मिळाली असून, त्यासाठीही ५ कोटींची तरतूद केली असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. त्यामुळे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला आता प्रशस्त ग्रामपंचायत कार्यालय मिळणार आहे.

राज्यात एकूण २८ हजार ग्रामपंचायती असून, ४,२४२ ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय नसल्याचे भुसे यांनी या वेळी सांगितले. या ग्रामपंचायतींना योजनेअंतर्गत कार्यालय देणार असल्याचे ते या वेळी म्हणाले. १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना महाराष्ट्र शासनाकडून १२ लाख रुपये निधी दिला जाणार आहे. ग्रामसचिवालयांसाठी याआधी केंद्राकडून अनुदान मिळायचे मात्र ते दोन वर्षांपासून अनुदान बंद झाले असल्याचे भुसे यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT