मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाट
मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाट 
मुख्य बातम्या

मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाट

टीम अॅग्रोवन

नाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या परिसरात गुरुवार (ता. १९) दुपारच्या सुमारास झालेल्या वादळामुळे उभी असलेली पिके भुईसपाट झाली आहेत.  दुपारी सुरू झालेल्या पावसासोबत हवेचा वेग अधिक असल्याने मका व बाजरीची काढणीच्या तोंडावर आलेली पिके भुईसपाट झाली. चालूवर्षी पाऊस वेळेवर झाला नाही. अनेक अडचणींचा सामना करून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. नंतर चांगला पाऊस झाल्याने पिकेही जोमात होती. मात्र, पावसाच्या व वादळ वाऱ्याच्या तडाख्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चालू वर्षी मोठ्या प्रमाणावर झालेला लष्करी अळीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसमोर डोकेदुखी ठरत असताना आवक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिके जगविली. मात्र, हा केलेला खर्च वाया जाणार असल्याची खंत येथील शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. जिरायती शेतकऱ्यांना मका व बाजरीचे पीक लाभदायक ठरते. धान्य व नंतर चाऱ्यातून लाभ मिळतो. नंतर जनावरांसाठी चारा वापरता यवतो. मक्तर चालू वर्षी या नुकसानीमुळे आर्थिक नियोजनासह चाऱ्याचे गणित कोलमडून जाणार हे नक्की आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT