संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कमी दरामुळे पणनच्या केंद्रांवर कापूस खरेदी शून्यच

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशातील पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीला प्रतिसाद मिळाला नाही. कमी दरांमुळेच शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रांकडे पाठ दाखविल्याचे चित्र आहे. दुसरीकडे एक बोंडही कापूस खरेदी न झाल्याने जे केंद्र सुरू केले त्यावर हकनाक खर्च झाला आहे.

खानदेशसह नाशिकच्या काही भागात पणन महासंघाने जळगाव विभागांतर्गत आठ खरेदी केंद्र सुरू केले. त्यात नाशिक जिल्ह्यातील येवला, मालेगाव तसेच धुळे, जळगाव जिल्ह्यात धरणगाव, पारोळा, अमळनेर, यावल, मुक्ताईनगर येथे खरेदी केंद्र सुरू केले. परंतु यापैकी एकाही केंद्रावर कापूस आवक सुरवातीपासून झालेली नाही. हे केंद्र सुरू होऊन सुमारे अडीच महिने झाले आहेत.

या आठ केंद्रांवर कर्मचारी व इतर यंत्रणा कार्यरत आहे. यातच अलीकडे मका, तूर, कडधान्य खरेदीसंबंधी मार्केटिंग फेडरेशन शेतकी संघ व इतर संस्थांची सब एजंट म्हणून नियुक्ती करतो. अशीच सब एजंट म्हणून पणन महासंघाचीही मार्केटिंग फेडरेशन किंवा नाफेडने थेट नियुक्ती करावी.

यामुळे शेतकऱ्यांची एकाच खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही व पणन महासंघाच्या कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग शासनाला करून घेता येईल, असे पणन संचालक संजय पवार यांनी म्हटले आहे.

कमी दरांमुळे शेतकऱ्यांची पाठ पणन महासंघाच्या केंद्रांना मागील पाच सहा वर्षांपासून फारसा प्रतिसादच जळगाव व धुळे जिल्ह्यांत मिळत नसल्याचे चित्र आहे. कारण मागील पाच सहा वर्षे जेवढा दर पणनच्या केंद्रात कापसाला जाहीर झाला, त्यापेक्षा अधिक दर खुल्या बाजारात मिळाला. यंदा ४३५०, ४२५० व ४१५० रुपये प्रतिक्विंटलचा दर पणनच्या केंद्रात कापसाच्या प्रजातीसह दर्जानुसार जाहीर झाला होता. परंतु यापेक्षा अधिक दर कापूस उत्पादकांना आपल्या गावातच खेडा खरेदीद्वारे खासगी व्यापाऱ्यांकडून मिळाला. यामुळे शेतकऱ्यांनी बैलगाडी किंवा इतर वाहनातून पणनच्या केंद्रात कापूस आणला नाही, अशी माहिती मिळाली.

पणन महासंघाच्या खानदेशातील केंद्रांवर कापूस आवक झालीच नाही. आम्ही कापूस उत्पादकांना ५०० रुपये बोनस दिला जावा, अशी मागणी केली होती. परंतु, त्या मागणीचीही दखल शासनाने घेतली नाही. कमी दरांमुळे शेतकरी पणनच्या केंद्रात कापूस आणत नाहीत.

- संजय पवार, संचालक, पणन महासंघ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

Baramati Lok Sabha Election : नणंद की भावजय, कोण मारणार बाजी

Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT