Due to 'jalyukt' the area cover on 1.5 lakh hectares in Parbhani
Due to 'jalyukt' the area cover on 1.5 lakh hectares in Parbhani 
मुख्य बातम्या

परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’मुळे दीड लाख हेक्टरवर क्षेत्राची सोय

टीम अॅग्रोवन

परभणी : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातंर्गंत २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षांच्या कालावधीत झालेल्या जलसंधारणाच्या १२ हजार ७६३ कामांमुळे ४५६ गावे शंभर टक्के जलपरिपूर्ण झाली आहेत. या गावांमधील कामांमुळे एकूण ८१ हजार ५५८.०२ टीसीएम पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. त्यापासून एक वेळ संरक्षित सिंचनासाठी १ लाख ६३ हजार ११६ हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाची सोय झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओलिताखालील क्षेत्रात वाढ झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातंर्गंत सन २०१५-१६ मध्ये १७० गावे, सन २०१६-१७ मध्ये १६० गावे, सन २०१७-१८ मध्ये १२८ गावे, सन २०१८-१९ मध्ये १२४ गावे मिळून एकूण ५८२ गावांची निवड करण्यात आली होती. यामध्ये परभणी तालुक्यातील ९४ , जिंतूर तालुक्यातील ११५, सेलू तालुक्यातील ६९, मानवत तालुक्यातील ४५, पाथरी तालुक्यातील ३२, सोनपेठ तालुक्यातील ४२, गंगाखेड तालुक्यातील ७९, पालम तालुक्यातील ५२, पूर्णा तालुक्यातील ५४ गावांचा समावेश आहे. 

या गावांमध्ये गेल्या चार वर्षांमध्ये ढाळीचे बांध, सलग समतल चर, माती नाला बांध, अनघड दगडी बांध, शेततळे, सिमेंट नाला बांध, के. टी. वेअर, विहिर पुनर्भरण, रिचार्ज शाफ्ट, ठिंबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, सिमेंट बंधारा दुरुस्ती, के. टी. वेयर दुरुस्ती, नाला खोलीकरण, लोकसहभाग तसेच शासकीय गाळ काढणे, नदी जोड प्रकल्प, भूमिगत बंधारे आदी मिळून एकूण १२ हजार ७६३ कामे पूर्ण झाली आहेत. 

मागील दोन वर्षांतील एकूण १३० कामे सुरू आहेत. पहिल्या दोन वर्षांत निवड झालेली सर्व गावे शंभर टक्के जलपूर्ण झाली. परंतु, मागील दोन वर्षांतील अनुक्रमे ८६ आणि ४० गावे शंभर टक्के जलपरिपूर्ण झाली आहेत. उर्वरित गावांमधील कामे पूर्ण झाल्यानंतर जलपरिपूर्ण गावांची संख्या १२६ ने वाढणार आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

‘जलयुक्त’ गावे, पाणीसाठवण क्षमता

वर्षे गावांची संख्या पाणीसाठण क्षमता (टीसीएममध्ये)
२०१५-१६ १७० ४०४०३.५३
२०१६-१७ १६०  २१९५५.४९
२०१७-१८ ४०  ७९५७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

SCROLL FOR NEXT