पेठ तालुक्यात जमिनीला पडलेल्या ‘त्या’ भेगा अतिवृष्टीमुळेच
पेठ तालुक्यात जमिनीला पडलेल्या ‘त्या’ भेगा अतिवृष्टीमुळेच  
मुख्य बातम्या

पेठ तालुक्यात जमिनीला पडलेल्या ‘त्या’ भेगा अतिवृष्टीमुळेच

टीम अॅग्रोवन

नाशिक : पेठ तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पाऊस झाल्यानंतर घोटविहीर, लिंगवणे व त्यानंतर मोहदाड या गावातील डोंगरांना भेगा पडल्या होत्या. या पडलेल्या भेंगांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या घाबरलेल्या नागरिकांना भूगर्भशास्त्र विभागाने दिलासा दिला आहे. सदरच्या भेगा भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्ती नसून या परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे भेगा पडल्याचा निष्कर्ष या भूवैज्ञानिक विभागातर्फे काढण्यात आला आहे. डोंगर उतारावर असलेल्या घोटविहीर पैकी उंबरमाळ गावाच्या डोंगराला आडव्या भेगा पडल्यामुळे माळीण सारखी आपत्ती ओढवण्याच्या भीतीने नागरिकांसह प्रशासन खडबडून जागे झाले. तहसीलदार हरिष भामरे व पोलीस निरीक्षक शिवाजी बढे यांनी घटना समजल्यानंतर तत्काळ रात्रीतून उंबरमाळच्या ग्रामस्थांना नजीकच्या करंजपाडा गावात सुरक्षित स्थलांतरित केले होते. त्या पाठोपाठ लिंगवणे, रानविहीर, शिवशेत या भागातही अशाच भेगा पडल्याने हा भूकंपसदृश प्रकार असल्याच्या भीतीने पेठ तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले होते. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार हरीश भामरे यांनी भूवैज्ञानिक विभागाच्या अधिकाऱ्यांसह भेगा पडलेल्या भागाची पाहणी करून भेटी दिल्या होत्या.  यानंतर या पाहणीनंतर अहवाल सादर केला असून, या पडलेल्या भेगा भूकंप नसल्याचे समोर आले आहे. या भेगा अतिवृष्टीने खडकात मुरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे पडल्याचा अहवाल दिला आहे. दोन बेसाल्ट जातीच्या खडकात पाणी मुरल्याने जमिनीला अशा प्रकारच्या भेगा पडत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain : राज्यात पावसाचे वातावरण कायम; देशातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम

Bungalow Dispute : पोलीसाने बंगला बांधला, पण...

World Bee Day : मधमाशी संवर्धन काळाची गरज

Turmeric Cultivation : नियोजन हळद लागवडीचे...

Soybean Varieties : मध्य भारतासाठी प्रसारित वैशिष्ट्यपूर्ण सोयाबीन वाण

SCROLL FOR NEXT