सातारा बाजारात दहा किलो शेवग्यास ३५० ते ४५० रुपये
सातारा बाजारात दहा किलो शेवग्यास ३५० ते ४५० रुपये 
मुख्य बातम्या

सातारा बाजारात दहा किलो शेवग्यास ३५० ते ४५० रुपये

टीम अॅग्रोवन

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १२) शेवगा, मेथी तेजीत असून पावटा, कोथिंबिरीच्या आवकेत वाढ झाली आहे. शेवग्याची सात क्विंटल आवक झाली अाहे. दहा किलो शेवग्यास ३५० ते ४५० असा दर मिळाला आहे. शेवग्यास रविवारच्या तुलनेत दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  वाटाण्याची एक क्विंटल आवक झाली असून, दहा किलो वाटाण्यास ६०० ते ७०० असा दर मिळाला. गवारीची आठ क्विंटल आवक झाली असून दहा किलो गवारीस ३०० ते ४०० असा दर मिळाला आहे. हिरवी मिरचीची २७ क्विंटल आवक झाली. दहा किलो मिरचीस २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. आल्याची सहा क्विंटल आवक होऊन दहा किलो आल्यास ४५० ते ५०० मिळाला आहे. वांग्याची १५ क्विंटल आवक होऊन दहा किलो वांग्यास १५० ते २५० दर मिळाला आहे. ओल्या भुईमूग शेंगेची २२ क्विंटल आवक होऊन दहा किलोस शेंगेस २५० ते ३०० दर मिळाला आहे. टोमॅटोची ५२ क्विंटल आवक झाली असून दहा किलोस ८० ते १३० असा दर मिळाला आहे. फ्लॉवरची २३ क्विंटल आवक झाली असून दहा किलोस १५० ते २५० दर मिळाला आहे. कांद्याची १०५ क्विंटल आवक झाली. कांद्यास दहा किलोस ९० ते १०० असा दर मिळाला. पावट्याच्या आवकेत वाढ झाली आहे. पावट्याची सहा क्विंटल आवक झाली असून दहा किलोस ४०० ते ५०० दर मिळाला आहे.  पालेभाज्यात मेथी तेजीत असून कोथिंबीरीच्या आवकेत वाढ झाली आहे. मेथीची १३०० जुड्याची आवक होऊन मेथीस शेकड्यास १००० ते २००० असा दर मिळाला आहे. कोथिंबीरीची २००० जुड्याची आवक झाली. कोथिंबिरीस शेकड्यास ५०० ते ८०० दर मिळाला आहे. फळात आंब्याची ९०० बॉक्‍स (प्रतिबॉक्‍स एक डझन) आवक झाली. आंब्यास प्रतिबॉक्‍सला ५० ते २५० असा दर मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT