उत्पादकतेने अधोरेखित केली दुष्काळाची तीव्रता
उत्पादकतेने अधोरेखित केली दुष्काळाची तीव्रता 
मुख्य बातम्या

उत्पादकतेने अधोरेखित केली दुष्काळाची तीव्रता

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद  : दुष्काळाची तीव्रता खरिपातील प्रमुख पिकांच्या उत्पादकतेने अधोरेखित केली आहे. पावसाच्या खंडाचा परिणाम औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील खरिपातील पिकांच्या उत्पादकतेवर झाल्याचे स्पष्ट चित्र आहे. वार्षिक पर्जन्यमान ७७९ मिलिमीटर असलेल्या मराठवाड्यात यंदा ऑक्‍टोबर अखेर सरासरी केवळ ५०१ मिलिमीटर म्हणजे वार्षिक पर्जन्यमानाच्या ६४ टक्‍केच पाऊस पडला होता. 

खरीप २०१८-२०१९ मध्ये सर्वसाधारण ४९ लाख १० हजार हेक्‍टरपैकी ४६ लाख १८ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. कपाशीवरील बोंड अळीच्या संकटामुळे सोयाबीनला पसंती दिली होती. परंतु सुरवात चांगली केल्यानंतर प्रदीर्घ खंड देणाऱ्या पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट येणार हे जवळपास स्पष्ट होते. 

कपाशीही संकटग्रस्तच राहिल्याने तिच्याही उत्पादनात मोठा फटका बसण्याची जी शक्‍यता होती ती स्पष्ट झाली आहे. मूग, उडीद, बाजरी, मका आदी पिकांतूनही फारसे काही घडले नाही. १५ लाख ८१ हजार हेक्‍टरवरील कपाशी, १९ लाख ३३ हजार हेक्‍टरवरील सोयाबीन, १ लाख ६५ हजार हेक्‍टरवरील मूग, १ लाख ५४ हजार हेक्‍टरवरील उडीद, १ लाख ३ हजार हेक्‍टरवरील बाजरी आदी पिकांच्या उत्पादकतेत घट येणे अपेक्षितच होते. बीड जिल्ह्यातील सर्वच पिकांच्या उत्पाकतेत यंदा औरंगाबाद व जालना जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त घट आल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यात खरीप ज्वारी हेक्‍टरी २ क्‍विंटल ३० किलो, बाजरी २ क्‍विंटल ५६ किलो, मका ३ क्‍विंटल ६८ किलो, तूर १ क्‍विंटल ८ किलो, मूग २ क्‍विंटल ४४ किलो, उडीद २ क्‍विंटल ६५ किलोच हेक्‍टरी उत्पादन झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  कापूस रुई पिकली हेक्‍टरी १ क्‍विंटल ७४ किलो औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत यंदा सरासरी हेक्‍टरी १ क्‍विंटल ७४ किलोच कपाशीचे उत्पादन झाले. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात कपाशीच्या रुईचे हेक्‍टरी १ क्‍विंटल ६७ किलो, जालना जिल्ह्यात २ क्‍विंटल ९७ किलो, तर बीड जिल्ह्यात हेक्‍टरी केवळ ५८ किलोच उत्पादन झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. तीनही जिल्ह्यांतील सरासरी हेक्‍टरी उत्पादकता (क्विंटलमध्ये)

पीक  उत्पादकता
ज्वारी   २.८५
बाजरी   ३.३८
मका    ९.७८ 
तूर    २.५८ 
मूग   २.२८
उडीद   २.६७
सोयाबीन ५.६७ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

SCROLL FOR NEXT