पेरणी
पेरणी  
मुख्य बातम्या

पावसाळ्यातही दुष्काळाचे चटके कायम...

टीम अॅग्रोवन

नाशिक: मागील वर्षी शेतकऱ्यांना गंभीर दुष्काळाचा सामना करावा लागला. यंदा तरी चांगला पाऊस होईल, अशी आपेक्षा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र अजूनही दिलासा मिळाला नाही. दुष्काळाचे संकट गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर कायम आहे. भर पावसाळ्यात आम्हाला दुष्काळ जाणवत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.  येवला तालुक्यातील अंदरसूल येथील शेतकरी रवी बनकर यांचे तर अर्थकारणच कोलमडले आहे. मागील वर्षी पाऊस कमी असल्याने येवला तालुक्यात चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला होता. त्यामुळे आपल्याकडील जनावरे जिवंत ठेवण्यासाठी शिल्लक असलेले भांडवल चाऱ्यासाठी खर्च केले अन जनावरे जगविली. आपल्याकडील भांडवल संपल्याने रवी बनकर हतबल झाले. खरिपाचा हंगाम तोंडावर आल्याने बियाणे अन् खतांसाठी चणचण होती. अखेर भर दुष्काळी परिस्थितीत जगवलेली जनावरे त्यांना विकावी लागली. यातून बियाणे खरेदी करून पेरणी केली. पुढे मका लागवड केल्यांनंतर मशागतीसाठी बैलजोडीची गरज भासू लागली. मात्र त्यांच्याकडे बैलजोडी उपलब्ध नसल्याने स्वतःच्या पदवीधर मुलगा प्रसाद यास कोळपणीला जुंपून मशागत करण्याची वेळ बनकर यांच्यावर आली आहे.  रवी बनकर हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. मात्र असे अनेक शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक कोंडीत सापडले असून, पैशांमुळे शेतीकाम व पेरण्यामध्ये अडचण येत आहे. चाऱ्या अभावी दूधधंदा अडचणीत सापडला आहे. चाऱ्याचे भावही दुप्पट झाले. जिल्हा बँकेची मंदावलेली कार्यपद्धती त्यात शेतीमालाला नसलेला भाव त्यामुळे दागिने गहाण ठेवून सावकारी पैसे घेणे, जनावरे विकून भांडवल उभे करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे पाऊस जरी पडत असला तरी या भर पावसाळ्यात आम्हाला दुष्काळ जाणवत असल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT