ड्रोन
ड्रोन  
मुख्य बातम्या

तेहतीस ड्रोन करणार राज्याची गावठाण मोजणी

टीम अॅग्रोवन

पुणे/सांगली : राज्यातील ३९ हजार ७०० गावांची ड्रोनच्या मदतीने मोजणी करून गावठाणाचे डिजिटल नकाशे तयार करण्यासाठी लवकरच ३३ ड्रोन राज्यात दाखल होतील, प्रत्यक्ष भूमापनास १ जूनपासून प्रारंभ होईल, अशी माहिती राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि भूमिअभिलेख संचालक एस. चोक्कलिंगम यांनी दिली. ३०० कोटी खर्च येणार ड्रोनच्या साह्याने प्रथम पुण्याच्या पुरंदर भागातील सोनोरी गावाची गावठाण मोजणी करून डिजिटल नकाशे यशस्वीपणे तयार करण्यात आले. त्यामुळे आता मंत्रिमंडळाने ३०० कोटी रुपयांच्या राज्यस्तरीय ड्रोन गावठाण मोजणी व डिजिटल नकाशे निर्मितीला मान्यता दिली आहे. 

ग्रामपंचायतींना होणार लाभ...

  •   ड्रोनमोजणी प्रकल्पाचा सर्वात जास्त लाभ राज्यातील ग्रामपंचायतींना होणार 
  •   राज्यातील प्रत्येक गावठाणातील एकूणएक घराचे बांधीव क्षेत्रफळ व खुली जागेची माहिती मिळणार
  •   करआकारणी करणे सुलभ होणार, मिळकतपत्रिकेमुळे पंचायतीचे कर उत्पन्न वाढेल. 
  •   नगरभूमापनाच्या फेरफारानुसार मिळकत आकारणी नोंदवहीला अद्यावत करण्याची सुविधा मिळणार 
  • ड्रोन असे करणार काम... प्रत्येक जिल्ह्यात ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हानिहाय प्रत्येकी १ ड्रोन युनिट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या गावठाणांमध्ये अद्यापही सर्व्हे झालेले नाहीत तिथे ड्रोनद्वारे गावठाण भूमापन केले जाईल. स्थळनिश्‍चितीसाठी जीपीएस निर्देशांकाचे संदर्भ ड्रोनला देणे आवश्‍यक आहे. काम सरकारच करेल. सर्व्हे नंबरच्या अभिलेख्याद्वारे गावठाणच्या सीमा निश्‍चित करून पिलर लावण्यात येतील. मिळकतीच्या हद्दी चुन्याच्या साह्याने दर्शविण्यात येतील. त्यानंतर गावठाणांचे ड्रोन छायाचित्र घेण्यात येईल. जीपीएस रीडिंग आणि ड्रोन इमेजची प्रक्रिया सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून करण्यात येईल. ड्रोन छायाचित्रांसह डिजिटल नकाशा तयार होईल. ज्या ठिकाणी झाडामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे जर काही मिळकती ड्रोन छायाचित्रात दिसून येत नसल्यास ईटीएस मशिनच्या साह्याने मोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यावर जाहीर नोटीस देऊन सूचना व हरकती मागविण्यात येतील व अंतिमत: गावठाण नकाशा अंतिम करण्यात येणार आहे.

    ड्रोन मोजणीचे फायदे पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा कमी वेळेत, कमी श्रमात व कमी मनुष्यबळाचा वापर करून मोजणी होईल. कामात पारदर्शकता व अचूकता, त्रिमितीय प्रतिमा (थ्रीडी इमेज) प्राप्त होत असल्यामुळे विविध विकास यंत्रणा व विभागांना नियोजन करताना सुलभता. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ९० दिवसांत प्रॉपर्टी कार्ड मिळू शकेल. प्रत्येक ठिकाणी न फिरता काम होईल.  योजनेची वैशिष्टे...

  •  ४३ हजार ७२१ गावांची मोजणी होणार; अवघ्या ४००० गावठाणांची आत्तापर्यंत पारंपरिक पद्धतीने मोजणी 
  •  ड्रोनच्या मदतीने संपूर्ण गावठाणांची मोजणी राज्यभर एकाच टप्प्यात देशात प्रथमच
  •  जमाबंदी आयुक्तांनी सर्व्हे ऑफ इंडियाकडे सातत्याने पाठपुरावा करून योजनेचा आराखडा केला तयार
  •  ३६ महिन्यांत हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याचे उद्दिष्ट; मोजणीने ३० वर्षांचे काम ड्रोनने तीन वर्षांत होणार
  • अशा होणार नोंदी

  •  ड्रोनच्या माध्यमातून चार ते ८ सेंटिमीटरचा दोष गृहीत धरून नोंदी घेता येणार.
  •  राज्यात जीपीएस प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ८० केंद्रे उभारणार
  •  नोंदींमुळे राज्यातील नागरिक मोबाईल ॲप आपल्या डिजिटल नकाशांचे वाचन करू शकणार
  •  या प्रकल्पामुळे नागरिकांना सनद मिळतील; त्यासाठी शुल्क आकारले जाईल
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

    Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

    Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

    Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

    Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

    SCROLL FOR NEXT