जमीन सुपीकतेसाठी गावनिहाय कार्यक्रम हवा : डॉ. राजाराम देशमुख
जमीन सुपीकतेसाठी गावनिहाय कार्यक्रम हवा : डॉ. राजाराम देशमुख 
मुख्य बातम्या

जमीन सुपीकतेसाठी गावनिहाय कार्यक्रम हवा : डॉ. राजाराम देशमुख

टीम अॅग्रोवन

देशात हरितक्रांती अत्यावश्यक होती. मात्र, त्यात सुधारित वाण, पाणी आणि रासायनिक खते-कीटकनाशकांचा वापर वाढला. तेथूनच जमिनीचे आरोग्य बिघडण्यास सुरवात झाली. आता जमिनीला निरोगी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागातून गावनिहाय कार्यक्रम राबवावे लागणार आहेत. जमिनीची धूप थांबविण्यासाठी मृद्‍संधारणाची कामे करणे, पीक पद्धतीत बदल, हिरवळीची खते किंवा आंतरपिकांचा वापर, रासायनिक खतांचा संतुलित वापर, जिवाणू खतांच्या वापरात वाढ, असे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून कामे करावी लागतील. राज्यात कृषी शिक्षण देताना देखील विद्यापीठे पहिल्या टप्प्यात आपले मेळावे, माहिती पुस्तिकांमधून जमिनीमध्ये कुजलेले शेणखत टाकण्याचा सल्ला देत होती, त्यामुळे सेंद्रिय कर्ब टिकून होता. काही दशकांपूर्वीचा विचार केल्यास मर्यादित सिंचन आणि पिकांची घनता देखील कमी होती. जादा उत्पादकता हा मुद्दा नव्हता. हरितक्रांतीनंतरच जमिनीच्या आरोग्य व्यवस्थेत मोठे बदल झाले. गहू आणि भातासाठी उत्तर भारतात सुधारित वाण, भरपूर पाणी आणि खते- कीटकनाशकांचा वापर वाढला. तेथूनच जमिनीचे आरोग्य बिघडण्यास सुरवात झाली. हरितक्रांती ही अत्यावश्यक देखील होती. यामुळे उत्तर भारतात उत्पादकता वाढली. काही राज्यांमध्ये सेंद्रिय कर्ब चांगला आणि पाणी देखील होते. महाराष्ट्रात पाण्याची समस्या होती. सिंचनाची सुविधा असलेल्या गावांनी मात्र थेट उसाकडे मोर्चा वळविला. पाण्याचा अतिरेकी वापर व त्याला जोड रासायनिक खतांची मिळाली. जनावरांची संख्याही कमी झाली. त्यामुळे शेतजमिनीत कुजलेले खत देखील कमी जाऊ लागले. त्यातून जिवाणूंचा नाश होत गेला व जमिनीची सुपीकता ढासळली. केंद्र व राज्य शासनाला आता जमिनींमधील जिवाणूवृद्धी तसेच सेंद्रियकर्ब वाढीसाठी विविध तंत्र किंवा योजना शेतकऱ्यांच्या दारात न्याव्या लागतील. जमिनीत जिवाणूंची संख्या कमी असल्यास आपण कोणतीही खते, कितीही वापरली तरी पिकांची उत्पादकता वाढणार नाही. उलट खते वाया जातील. जमिनीची पाणी धारण क्षमताच कमी झालेली असेल, तर कितीही पाणी दिले तरी मातीत पाणी थांबणार नाही, त्यामुळे सरकारने आता सिंचनाला दुय्यम आणि पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीच्या आरोग्य संवर्धनाला प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे. - डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरू

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT