पुष्प संशाेधन संचालनालयाच्या वतीने राष्ट्रीय शेवंती दिनानिमित्त मांजरी प्रक्षेत्रावर मंगळवारी (ता. २८) शेवंतीच्या विविध ११० वाणांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
पुष्प संशाेधन संचालनालयाच्या वतीने राष्ट्रीय शेवंती दिनानिमित्त मांजरी प्रक्षेत्रावर मंगळवारी (ता. २८) शेवंतीच्या विविध ११० वाणांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. 
मुख्य बातम्या

पुष्पोत्पादनात मोठ्या संधी : डॉ. प्रसाद

टीम अॅग्रोवन

पुणे ः फुलांची मागणी वाढत असून, शेतकऱ्यांनी पांरपरिक भाजीपाला पिकांपेक्षा फूल उत्पादनाकडे वळण्याची गरज आहे. तसेच फुलांच्या मूल्यसंवर्धनातूनदेखील अधिकचा नफा मिळत असून, हे क्षेत्रात माेठ्या संधी आहेत, असे प्रतिपादन पुष्प संशाेधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी केले.  पुष्प संशाेधन संचालनालयाच्या वतीने मंगळवारी (ता. २८) राष्ट्रीय शेवंती दिनानिमित्त मांजरी (पुणे) येथील प्रक्षेत्रावर शेवंती सप्ताहाचे आयाेजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आयाेजित शेतकरी मेळाव्यात डॉ. प्रसाद बाेलत हाेते. या वेळी बारामती केव्हीकेचे प्रमुख डॉ. सय्यद शाकिरअली, पुणे बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाचे उपाध्यक्ष भूषण तुपे, नारायणगाव केव्हीकेचे विषय विशेतज्ञ बी. जी. टेमकर आदी उपस्थित हाेते.  डॉ. प्रसाद म्हणाले, की पुष्प संशाेधन संचालनालयाच्या वतीने देशात उपलब्ध असणाऱ्या शेवंतीच्या सुमारे ११० वाणांवर संशाेधन मांजरी येथील प्रक्षेत्रावर सुरू आहे. सध्या केवळ पांरपरिक पिवळ्या आणि पांढऱ्या शेवंतीचेच उत्पादन शेतकऱ्यांकडून घेतले जात आहे. मात्र शहरीकरणाबरोबर विविध फुलांना मागणी वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेची मागणी आणि गरज लक्षात घेता पारंपरिक शेवंतीच्या वाणांपेक्षा विविधरंगी वाणांचे उत्पादन घेण्याची गरज आहे. तसेच फुलांच्या प्रक्रिया आणि मूल्यवर्धनातून नैर्सगिक रंग, अत्तरेदेखील निर्माण करण्याचे उद्याेग उभारण्याची गरज आहे. पुणे बाजार समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुलबाजारात प्रक्रिया आणि मूल्यवर्धन केंद्र उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहाेत.  डॉ. सय्यद शाकिरअली म्हणाले, ‘‘त्याच त्याच शेतमालाच्या उत्पादनामुळे विशिष्ट शेतमालाचे उत्पादन वाढत आहे. परिणामी बाजारपेठेतील मागणीपेक्षा पुरवठा जास्त हाेत असल्याने टाेमॅटाे, पाेलभाज्या टाकून देण्याची वेळ येते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांपेक्षा फुलशेतीकडे वळण्याची गरज आहे.’’  भूषण तुपे म्हणाले, ‘‘पुणे शहरात फुलांची बाजारपेठ विस्तारत असून पुणे बाजार समितीची फुलांची सध्याची उलाढाल १२५ काेटींची आहे. फुलांची वाढता व्यापार लक्षात घेता बाजार समिती १०० काेटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाचे फूल मार्केट उभारत आहे. या मार्केटद्वारे फुलांची उलाढाल ५०० काेटी रुपयांपर्यंत जाणार असून, शेतकऱ्यांना माेठी संधी निर्माण झाली आहे. पुष्प संशाेधन संचालनालयाचे मुख्यालय मांजरी येथे ५० एकरांवर हाेणार असल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही सुवर्णसंधी ठरणार आहे.  शास्त्रज्ञ गणेश कदम यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले. या वेळी शेवंती आणि गुलछडीच्या विविध वाणांच्या प्रक्षेत्राला शेतकऱ्यांनी भेट देत विविध वाणांची माहिती घेतली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT