संमेलन
संमेलन  
मुख्य बातम्या

महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी तीन वाणांची शिफारस करणार: डॉ. बक्शी राम

टीम अॅग्रोवन

पुणे:उसाच्या ८६०३२ या वाणाला पर्याय आणि प्रभावी ठरणारा को- ११०१५ वाण लवकरच महाराष्ट्रासाठी शिफारस केला जाईल. याच्या चाचण्या महाराष्ट्रात सुरू असून तमिळनाडूपेक्षा कोल्हापूर परिसरातील वातावरण या वाणाला अधिक पोषक असल्याने किमान एक टक्क्याने साखर उतारा वाढेल, अशी माहिती कोईम्बतूरच्या ऊस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. बक्शी राम यांनी दिली. तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील २०२१ मध्ये तीन वाणांची शिफारस केली जाईल, त्याच्या चाचण्या मराठवाड्यात सुरू असल्याचेही राम यांनी सांगितले. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या (डीएसटीए) ६५ व्या वार्षिक संमेलनाच्या निमित्ताने मंगळवारी (ता. १) पुण्यात झालेल्या कार्यक्रमानंतर डॉ. राम यांनी ही माहिती दिली. या वेळी बोलताना डॉ. राम म्हणाले, ‘‘कोईम्बतूरच्या संशोधन केंद्रात अनेक वाणांवरील संशोधन अर्धवट अवस्थेत होते. मी संचालक झाल्यावर अर्धवट वाणांच्या संशोधनाला गती देण्याचे काम केले आहे. महाराष्‍ट्रासाठी विशेषतः दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी तीन वाणांच्या चाचण्या विविध चार जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत. यामध्ये को ८५०१९, ९८०१७ आणि ०९००४ या वाणांचा समावेश आहे. या वाणांच्या चाचण्यांचे सकारात्मक परिणाम दिसून आले असून, २०२१ मध्ये या वाणांची महाराष्ट्रातील दुष्काळी भागांसाठी शिफारस केली जाईल.’’ ‘‘महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमधील वाणांच्या संशोधन आणि विकासासाठी २०१६ मध्ये मराठवाड्यात सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार कोईम्बतूरच्या संशोधन केंद्रातील १८ वाणांच्या संशोधनातील वरील तीन वाणांच्या चाचण्या कोपरगाव, नांदेड, जालना आदी ठिकाणी सुरू आहेत. त्याचे सकारात्मक निकाल येत असून, चाचण्या अंतिम झाल्यावर  २०२१ मध्ये शेतकऱ्यांना हे वाण उपलब्ध करून दिले जातील,’’ असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, वार्षिक संमेलनाच्या उद्‍घाटनपर भाषणामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा म्हणाले, ‘‘शाश्‍वत उत्पन्न आणि रोजगार देणारा ऊस आणि साखर ही क्षेत्रे असून, या क्षेत्रावर हवामान बदलाचे संकट आहे. हवामान बदलाला तग धरणाऱ्या आणि रोगमुक्त उसाच्या नवीन वाणांच्या संशोधन हे आमच्यासमोर आव्हान आहे. तसेच भविष्यात कमीत कमी पाण्यावर जास्त साखर उतारा देण्याबरोबरच उत्पादन खर्च कमी करण्याच्या पद्धती विकसित करत आहोत. यामध्ये आंतरपिकासाठीचे विविध प्रयोग सुरू आहेत. कार्यक्रमाला वसंतदादा साखर संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, राष्‍ट्रीय साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, कानपूरच्या राष्ट्रीय ऊस संशोधन केंद्राचे नरेंद्र अग्रवार, डीएसटीएचे उपाध्यक्ष एस. एस. गंगावती, बी. डी. पवार, सचिव डॉ. एस. एम. पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये ऊस आणि साखर उद्योगामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध शेतकरी आणि उद्योजकांना या वेळी गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीएसटीएचे अध्यक्ष मानसिंगराव जाधव यांनी केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT