डाॅ. अनिल बोंडे
डाॅ. अनिल बोंडे  
मुख्य बातम्या

दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ. अनिल बोंडे

टीम अॅग्रोवन

पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे. पुन्हा पावसाचा चांगला अंदाज वर्तविण्यात आला आहे. तरीही पाऊस न पडल्यास दुबार पेरणीची वेळ आल्यास शासन सक्षम आहे. दुबार पेरणीसाठी सोयाबीनचे सुमारे एक लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तसेच इतर पिकांचे बियाणे उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले.  पुण्यातील कृषी आयुक्तालयात कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे कृषी विभागाची आढावा बैठक शुक्रवारी (ता. १९) घेण्यात आली. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कृषिमंत्री बोंडे यांनी ही माहिती दिली. या वेळी कृषी आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते. 

कृषिमंत्री बोंडे म्हणाले, की पीक विम्यामध्ये करारनाम्यामध्ये काय बदल करणे अपेक्षित आहे. या संदर्भात शेतकरी आणि विमा कंपन्या यांची कार्यशाळा घेतली आहे. त्यामध्ये पिकांचा जोखीम स्तर ७० टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत नेला आहे. याशिवाय तालुका पातळीवर पीक विम्याचे प्रश्न सोडविण्यासाठी दक्षता समित्या नेमल्या आहेत. ज्या तालुक्यांमध्ये आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे, आणि शासन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे दुष्काळ घोषित झालेला आहे. अशा या तालुक्यांमध्ये उंबरठा उत्पन्न कमी होत असले तरी या तालुक्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी त्याचा पाठपुरावा सुरू आहे.  झिरो बजेट शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. त्यासाठी शासन कटिबद्ध आहे. गेल्या वर्षी २७०० हेक्टरवर फळबाग लागवड झाली होती. यंदा २८९९ हेक्टवर फळबाग लागवड अपेक्षित आहे. तसेच गेल्या वर्षीच्या मृग बहारातील फळबाग योजनेतील नुकसान भरपाई शंभर टक्के दिली आहे. पीएम किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांची माहितीचा डेटा अपलोड केला गेलेला आहे. या शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान योजनेच्या प्रमाणे दोन हप्त्यामध्ये चार हजार रुपये निश्चितपणे त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT