अनिल बोेंडे
अनिल बोेंडे 
मुख्य बातम्या

कृषी विभाग उभारणार गाव पातळीवर शेतकरी भवनः डाॅ. अनिल बोंडे

टीम अॅग्रोवन

नागपूर ः ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांकरिता बैठकीची व्यवस्था केल्यानंतर लवकरच गावपातळीवर शेतकरी प्रशिक्षणाकरिता शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे. सुमारे एक एकर जागेवर हे भवन उभारण्याचे प्रस्तावित असून, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायतीला तब्बल २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.  गावस्तरावर कृषी सहायक उपलब्ध होत नाही, अशा तक्रारी वाढीस लागल्या होत्या. त्याची दखल घेत ग्रामपंचायत कार्यालयातच कृषी सहायकाकरिता बसण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. कृषी व ग्रामविकास खात्याकडून त्यासंदर्भाने संयुक्‍त परिपत्रक काढण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावरील या कृषी सहायक कक्षात आवश्‍यक फर्निचरचीदेखील व्यवस्था केली जाणार आहे. कृषी सहायकाचे नाव, भेटीचा दिवस आणि वेळही त्या ठिकाणी नमूद राहणार आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरावरून स्वागत झाले. त्यानंतर आता प्रत्येक गावस्तरावर शेतकरी भवन उभारण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. सुमारे एक एकर जागा याकरीता प्रस्तावीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कृषिमंत्री बोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘सध्या शेतीशाळा तसेच गावपातळीवरील विविध प्रशिक्षण घेण्याकरिता जागाच उपलब्ध राहत नाही. त्यामुळे मंदिर, एखाद्या मोठ्या घराच्या ओसरीचा आधार प्रशिक्षणाकामी घ्यावा लागतो. ही अडचण शेतकरी भवनच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे. ग्रामपंचायतींना प्रस्तावित शेतकरी भवनासाठी एक एकर जागा द्यावी लागणार आहे. त्या ठिकाणी किमान ५० शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण सभागृह, लगतच कृषी सहायकांचे कार्यालय आणि डेमो प्लॉट राहणार आहेत. कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने या डेमो प्लॉटचे व्यवस्थापन केले जाईल. योग्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून पीक vउत्पादकता वाढ कशी साधता येईल, हे त्या गावातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.’’ ‘‘गाव स्तरावरील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ तसेच केव्हीकेमध्ये जाऊन प्रात्यक्षिक प्लॉट नजरेखालून घालणे अनेकदा शक्‍य होत नाही. त्यांच्यासाठी गावातच ही सुविधा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. शेतकरी भवनाला कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठ तज्ज्ञ, केव्हीके विषयतज्ज्ञ यांच्यादेखील भेटी सातत्याने होतील, त्यामुळे गावपातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासदेखील हा प्रकल्प साहाय्यभूत ठरणार आहे. त्या गावात पिकाचे क्‍लस्टर तयार करून शेतकरी कंपनीच्या माध्यमातून उत्पादित शेतमाल मार्केट लिंक करण्याकरितादेखील याद्वारे पुढाकार घेण्याचे प्रस्तावित आहे,’’ अशी माहिती कृषिमंत्र्यांनी दिली. ठाण्यात शेतकऱ्यांकरिता निवासाची सोय गावपातळीवर शेतकरी भवन उभारण्यासोबतच ठाणे कृषी कार्यालयाअंतर्गत ५० शेतकऱ्यांना राहता येईल, अशी डॉरमेट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याच ठिकाणी २५० शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची सोय होईल, असे प्रशिक्षणगृही उभारले जाणार आहे. या कामाची सुरवातदेखील झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT