Double the farmer's income 23 MPs back to the meeting
Double the farmer's income 23 MPs back to the meeting 
मुख्य बातम्या

शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३ खासदारांची पाठ

टीम अॅग्रोवन

 नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी समितीची शनिवारी (ता. २७) होणारी बैठक गणसंख्येअभावी रद्द करावी लागली. बैठकीला २९ पैकी केवळ सहाच खासदार उपस्थित होते, २३ खासदारांनी दांडी मारली. बैठकीत शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याविषयी चर्चा होणार होती.  बैठकीला समितीचे अध्यक्ष पर्वतगौडा, प्रतापसिंग बाजवा, बी. बी. पाटील, अबू तहर खान, कैलाश सैनी, रामनाथ ठाकूर हे सहा खासदारच बैठकीला उपस्थित होते.   बैठकीला उपस्‍थित असलेले एक सदस्य म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे आर्थिक उत्‍पन्न दुप्पट करण्याच्या विषयावर होणारी ही महत्त्वाची बैठक पुरेशा गणसंख्येअभावी रद्द करावी लागल्यामुळे मी नाराज आहे. या बैठकीसाठी मी खास दिल्लीला आलो होतो.’’ पंतप्रधान मोदी यांनी तीन कृषी कायदे माघारी घेण्याचे जाहीर केले होते. कॅबिनेटमध्ये त्यावर शिक्कामोर्तबही झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर संसदेच्या या कृषी विषयक स्थायी समितीच्या बैठकीला विशेष महत्त्व होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT